Kiara Advani and Sidharth Malhotra Instagram @sidmalhotra
मनोरंजन बातम्या

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ- कियाराच्या घरी वाजणार सनई-चौघडे; खास पेहरावासाठी कियाराचे स्पेशल कलेक्शन...

सिद्धार्थ- कियारा ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसल्यानंतर रिअल लाईफमध्ये एकत्र कधी दिसणार असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडला होता.

Chetan Bodke

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ- कियारा ही जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसल्यानंतर रिअल लाईफमध्ये एकत्र कधी दिसणार असा प्रश्न अनेकदा चाहत्यांना पडला होता. येत्या काही दिवसातच चाहत्यांना या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. 6 फेब्रुवारी 2023 रोजी दोघेही लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही परिवारातील सदस्य आणि मोजकेच मित्र परिवार हजर राहण्याची शक्यता आहे.

लग्नाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून त्यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. एकीकडे कियारा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत स्पॉट झाली आहे, तर दुसरीकडे सिद्धार्थ त्याच्या गावी दिल्लीला पोहोचला आहे. या दोघांचेही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

कियारा अडवाणी मंगळवारी रात्री उशिरा मनीष मल्होत्रासोबत दिसली. त्यांना एकत्र पाहिल्यानंतर, कियारा तिच्या लग्नात परिधान करणारा ड्रेस मनीषने डिझाईन केला असल्याचा अंदाज चाहते बांधत आहेत. कियाराच्या लग्नासाठी मनीषने काही स्पेशल वेडिंग लेहेंगा डिझाइन केला आहेत.

तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही लग्नाच्या पाच दिवस आधी दिल्लीला रवाना झाला आहे. कियारा आणि सिद्धार्थचे लग्न जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थ आपल्या कुटुंबासोबत दिल्लीहून जैसलमेरला रवाना होणार आहे.

दोघांच्याही वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कियारा गेल्या काही दिवसांपुर्वी 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात दिसली होती. आता ती कार्तिक आर्यनसोबत 'सत्यप्रेम की कथा'मध्ये झळकणार आहे. सोबतच कियाराचा राम चरणसोबत एक तेलुगु चित्रपटही आहे. सिद्धार्थबद्दल सांगायचे तर, 'मिशन मजनू'नंतर तो आता करण जोहरच्या 'योद्धा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात निवडणुकीच्या धामधूमीत नवीन पक्षाची एंट्री

Mumbai : धक्कादायक! विहारातील गौतम बुद्धांच्या मूर्तीची चोरी, मुंबई पोलिसांनी तासात आरोपीच्या मुसक्या आवळल्या

Local Body Election : अर्ज भरण्याआधी मविआला भाजपचा धक्का, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Pune : पुण्यात अटक केलेल्या झुबेरचं पाकिस्तान कनेक्शन, लॅपटॉपमध्ये भरमसाठ डेटा, हादरवणारी माहिती समोर

Methi Bhaji Recipe : हिवाळ्यात 'अशा' पद्धतीने बनवा मेथीची चटपटीत भाजी, मुलं आवडीने फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT