Parvin Dabas  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Parvin Dabas Accident: बॉलिवूड अभिनेता परवीन दाबसचा झाला मोठा अपघात; रूग्णालयात ICU मध्ये उपचार सुरू

Parvin Dabas Accident: 'खोसला का घोसला' फेम बॉलिवूड अभिनेता परवीन डबासचा अपघात झाला आहे. सध्या त्यांच्यावर मुंबईतील रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेता परवीन डबासचा अपघात झाला आहे. मुंबईतील वांद्रे येथील हॉस्पीटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले आहे. सध्या परबीनवर आय. सी. यू. मध्ये उपचार सुरू आहेत. . सध्या रूग्णालयात परवीन डबाससोबत त्यांची पत्नी आणि कुटुंब आहेत.

शनिवारी सकाळी परवीनचा अपघात झाला आहे. परवीन , आर्म रेसलिंग Pro Panja League चा सह-संस्थापक आहे. Pro Panja League ने अधिकृत निवेदन जारी करत ही माहिती दिली आहे. त्यांनी प्रो. पंजा लीगचे सह- संस्थापक परवीन डबास सध्या रूग्णालयात दाखल असल्याचं म्हटलं आहे. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. शनिवारी सकाळी प्रवासादरम्यान त्याचा अपघात झाला आहे. परवीन स्वत: ड्राईव्ह करत असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

प्रो पंजा लीगची टीम हॉस्पीटलमध्ये लक्ष ठेवून आहे. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. आम्ही सर्वांना आवाहन करतो की, या कठिण प्रसंगात परवीन आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या गोपनियतेची काळजी घेतली जावी. तसेच चाहते देखील परवीन लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत.

परवीन डबासने रागिनी एमएमएस 2, माय नेम इज खानसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. माय नेम इज खान यामधील परवीनच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. 'मेड इन हेवन' या वेब सीरिजमध्येही त्याने काम केलं आहे. मैने गांधी को नही मारा, ये है जिंदगी, कुछ मीठा हो जाए, इंदू सरकार या चित्रपटांमध्ये परवीन दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate : ऐन लग्नसराईत चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किमतीतही मोठा बदल; वाचा सुवर्णनगरीतील आजचे दर

Matka Water: माठात ही १ सिक्रेट गोष्ट ठेवा, पाणी फ्रिजपेक्षा होईल थंडगार

मुंबईत सकाळ समूहाच्या माध्यमातून यिन मिनिस्ट्री 2026 अधिवेशन उत्साहात|VIDEO

Salman Khan : 'मातृभूमी' चित्रपटानंतर भाईजानचा आणखी एक धमाका; नव्या सिनेमाची घोषणा, पहिला फोटो आला समोर

Eknath Khadse: शरद पवार गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT