khatron ke khiladi 15 Saam tv
मनोरंजन बातम्या

khatron ke khiladi 15: तुफानी स्टंट्स आणि जबरदस्त टास्क; 'खतरों के खिलाडी १५' मध्ये 'या' १२ सेलिब्रिटींची एन्ट्री

khatron ke khiladi 15: भारताचा स्टंट-आधारित रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी' आपला १५ वा सीझन घेऊन परतण्यासाठी सज्ज झाला आहे. या नवीन सीझनचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेतील केप टाउन येथे केले जाईल.

Shruti Vilas Kadam

khatron ke khiladi 15: प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी होस्ट करत असलेला लोकप्रिय स्टंट रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी १५’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. २०२५ मध्ये काही कारणांमुळे थांबलेला हा शो आता नव्या सीझनसह धमाकेदार कमबॅक करत असल्याने चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘खतरों के खिलाडी १५’ या नव्या सीझनसाठी अधिकृत स्पर्धकांची यादी जाहीर झालेली नसली, तरी सोशल मीडियावर आणि विविध रिपोर्ट्समध्ये काही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. या यादीत अनेक लोकप्रिय रिअॅलिटी शो स्टार्स आणि टीव्ही सेलिब्रिटींचा समावेश असल्याच्या चर्चा सोशल मीडीयावर रंगल्या आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉस फेम विनर  गौरव खन्ना, रनरअप फरहाना भट्ट, सोशल मीडिया सेंसेशन तान्या मित्तल, अविनाश मिश्रा, चुम दरंग, दिग्विजय राठी, श्रुतिका अर्जुन आणि मनीषा राणी यांसारख्या नावांची चर्चा जोरात आहे.

'राइज एंड फॉल' आणि 'द 50'  यांसारख्या शोमधील स्पर्धक असलेल्या अरबाज पटेललाही या शोसाठी विचारण्यात आले आहे. याशिवाय बेसर अली, अभिषेक बजाज आणि इतर काही सेलिब्रिटींचीही या शोसाठी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विशेष म्हणजे, या यादीतील अनेक कलाकारांनी याआधी बिग बॉससारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला असून त्यांनी तिथे दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे ‘खतरों के खिलाडी १५’मध्ये त्यांच्यातील धाडस पाहायला मिळणार आहे. हा शो जून 2026 च्या सुमारास सुरू होण्याची शक्यता असून शूटिंग मे महिन्यात सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

1500 लोकांचा मृत्यू, 5 मिनिटांत बॉडी गायब; गडचिरोलीतील मृत्यूंबाबत राऊतांचा मोठा आरोप

मूड खराब झाल्यास मिळणार सुट्टी; भारतातही पॉलिसी राबवणार, उद्योगपतींचे संकेत

जरांगे प्रवास करत असलेल्या डिफेंडरवरून वाद; महागड्या गाडीतून जरांगेंचा आरक्षण दौरा

सरकारी-खासगी शाळा दिपकेंच्या रडारवर ; CJPचं शाळा सुधार आंदोलन

Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत मोठी अपडेट; राज्य सरकारनं मराठा समाजासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT