Tunisha Sharma Mother Sends Legal Notice Saam Tv
मनोरंजन बातम्या

शीजान खान Khatron Ke Khiladi 13 मधून बाहेर?, टुनिषाच्या आईने थेट चॅनललाच धाडली नोटीस

‘खतरों के खिलाडी’या शोमध्ये शीजान खानला शोमध्ये घेतल्यानंतर टुनिशा शर्माच्या आईने चॅनलला कायदेशीर नोटीस पाठवली.

Chetan Bodke

Tunisha Sharma Mother Sends Legal Notice: निर्माते रोहित शेट्टी सध्या आगामी ‘खतरों के खिलाडी’या शोमुळे बराच चर्चेत आला आहे. लवकरच या शोचा तेरावा सीझन सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी या शोमधील स्पर्धकांच्या नावाची यादी समोर आली, त्यात शीजान खानचेही नाव होतं. शीजान खान काही महिन्यांपूर्वी टुनिशा आत्महत्या प्रकरणात अडकला होता, ज्यात पोलिसांनी त्याची चौकशीही केली होती. ‘खतरों के खिलाडी’या शोमध्ये शीजान खानला शोमध्ये घेतल्यानंतर टुनिशा शर्माच्या आईने चॅनलला कायदेशीर नोटीस पाठवली.

टेलिव्हिजन अभिनेत्री टुनिषा शर्माची आई वनिता शर्माने चॅनलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे, पण चॅनलने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. त्याचा पासपोर्ट कोर्टाने जप्त केला असून त्यासाठी त्याने कोर्टात अर्जही दाखल केला होता. शीजानला परदेशात जाण्याची परवानगी नाकरण्यात आली होती. मात्र आता त्याला दिलासा देत शीझानचा हा अर्ज मुंबईच्या वसई न्यायालयाने मंजूर केला आहे.

टुनिषा शर्माच्या आईने एका निवेदनात म्हटले आहे की, चॅनल ही अतिशय चुकीची गोष्टी करत आहे. शीजान खानवर भारतीय दंड संहितेच्या कलम 306 अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी शीजान विरोधात 524 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ‘खतरों के खिलाडी’ 13 सारखे मोठे व्यासपीठ त्याच्यासारख्या व्यक्तीला देणं चुकीचा संदेश पसरवेल असंही त्या म्हणाल्या. लोक टीव्ही स्टार्स आणि सेलिब्रिटींना आपला आदर्श मानतात आणि तुम्ही त्याला शोमध्ये घेऊ शकत नाही.

टुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणाबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्रीच्या आत्महत्येने संपूर्ण टीव्ही इंडस्ट्री हादरली होती तिच्या अचानक एक्झिटमुळे कोणाचाच विश्वास बसत नव्हता. टुनिषासोबत तिचा लीड ॲक्टर शीजानसोबत अफेयर असल्याच्या चर्चा देखील होत होती. आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी त्याला जबाबदार धरत त्याच्यावर अनेक आरोप केले. डिसेंबर महिन्यात शीजानची रवानगी तुरूंगात करण्यात आली होती, त्यानंतर तब्बल 2 महिने तुरुंगात घालवल्यानंतर 4 मार्च रोजी शीजानची सुटका झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT