Kangana Ranaut Wedding Rumours  साम टीव्ही मराठी
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Wedding : कंगना रणौतनं गुपचूप लग्न केलं? गळ्यात मंगळसूत्र अन् हातात हिरव्या बांगड्या; 'त्या' फोटोने उडवली खळबळ

Kangana Ranaut Wedding Rumours : कंगना रणौतच्या गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या दिसल्यानंतर तिच्या गुपचूप लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे. व्हायरल फोटोमागचं खरं कारण काय? जाणून घ्या सविस्तर.

Namdeo Kumbhar

Kangana Ranaut secret wedding viral photos : बॉलीवूडची 'क्वीन' तसेच भाजप खासदार कंगना रणौत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर कंगना यांचा एक फोटो तुफान व्हायरल होत असून, त्यांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. या व्हायरल फोटोमध्ये कंगना यांच्या गळ्यात मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या दिसत असल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. या लूकमुळे सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाबाबत विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

कंगना यांचा चर्चेतला लूक

व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडिओंमध्ये कंगना कडक सुरक्षा व्यवस्थेत आपल्या घरातून बाहेर पडताना दिसत आहेत. फिकट गुलाबी रंगाचा सलवार-सूट घातलेल्या कंगना यांनी चेहऱ्यावर कोणताही विशेष भाव न दाखवता, पापाराझींशी (कॅमेरामन) बोलणे टाळले. त्या थेट आपल्या गाडीत जाऊन बसल्या. मात्र, कॅमेऱ्यात कैद झालेल्या त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राने आणि हातातील हिरव्या बांगड्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. एका सोशल मीडिया युझरने लिहिले, “मंगळसूत्र? त्यांचे लग्न झाले का?” तर दुसऱ्याने टिप्पणी केली, “कदाचित त्या एखाद्या चित्रपटाचे शूटिंग करत असाव्यात.” आणखी एका चाहत्याने म्हटले, “नक्कीच त्यांना माहीत होते की कॅमेरा हे टिपणार आहे. तो भाग्यवान कोणीही असो, त्यांच्यासाठी हे चांगलंच आहे. त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखी होवो.”

'क्वीन फॉरएव्हर'साठी सुरू आहे चित्रीकरण?

कंगना यांनी खरोखरच गुपचूप लग्न उरकले आहे की हा त्यांच्या आगामी चित्रपटातील एखादा लूक आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कंगना रणौत यांनी मुंबईत 'क्वीन २' च्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. हा चित्रपट सध्या 'क्वीन फॉरएव्हर' (Queen Forever) या तात्पुरत्या शीर्षकाखाली (Working Title) बनवला जात असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कंगना यांचा हा वधूच्या वेशातील लूक त्यांच्या वास्तविक आयुष्यातील नसून, चित्रपटातील पात्राचाच एक भाग असल्याचे अनेक चाहत्यांनी म्हटले आहे.

लग्नाच्या या व्हायरल फोटोंवर आणि अफवांवर अजूनही कंगना रणौत किंवा त्यांच्या टीमकडून कोणतीही अधिकृत पुष्टी (Official Confirmation) देण्यात आलेली नाही. मात्र, या लूकने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुसळधार पावसात बनवा गरमा गरम कढी पकोडा, सोपी आहे रेसिपी

Maharashtra Live Update: अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात, 3700 हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Vijaydurg Fort : शिवरायांनी जिंकलेला सागरी किल्ला! 'विजयदुर्ग' पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा?

Ganesh Murti Price Hike: गणेशभक्तांना महागाईचा फटका, यंदा गणेशमूर्ती २५ ते ३० टक्क्यांनी महागणार, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT