Shatrughan Sinha Hugs And Zaheer Iqbal Meets Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shatrughan Sinha Hugs And Zaheer Iqbal : जावई आवडला, विषय संपला! सोनाक्षीच्या होणाऱ्या नवऱ्याला शत्रुघ्न सिन्हांनी मारली मिठी! VIDEO

Shatrughan Sinha Hugs And Zaheer Iqbal Meets : झहीर सोनाक्षीच्या कुटुंबाबरोबर टाईम स्पेंड करताना स्पॉट झाला आहे. झहीरचा आणि सिन्हा फॅमिलीसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Chetan Bodke

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल येत्या रविवारी (२३ जून) लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईत सोनाक्षी आणि जहीरचं लग्न होणार असून दोघांच्याही घरी जोरदार लगीनघाई आहे. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नामुळे सिन्हा फॅमिली नाराज होते, अशी चर्चा होती. सोनाक्षी 'फादर्स डे'निमित्त झहीरच्या कुटुंबाबरोबर एकत्र टाईम स्पेंड करत होती. आता झहीर सोनाक्षीच्या कुटुंबाबरोबर टाईम स्पेंड करताना स्पॉट झाला आहे. झहीरचा आणि सिन्हा फॅमिलीसोबतचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गुरूवारी रात्री सोनाक्षीचा होणारा पती झहीर इक्बालच्या घरी सिन्हा कुटुंबीयांनी उपस्थित लावली होती. त्यावेळी लाडक्या जावयाची शत्रुघ्न सिन्हांनी भेट घेतली. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये शत्रुघ्न आणि झहीर दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत. शत्रुघ्न झहीरसोबत आनंदीत दिसत होते. दोघांनीही हसत हसत कॉम्प्लेक्सच्या बाहेर पापाराझींसमोर फोटो पोजेसही दिलेल्या आहेत. नाराजीवर स्पष्टीकरण दिल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी शत्रुघ्न लग्नाच्या आधी झहीर इक्बालबरोबर पहिल्यांदाच दिसले.

सध्या इन्स्टाग्रामवर सिन्हा कुटुंबीयांच्या आणि इक्बाल कुटुबीयांच्या भेटी दरम्यानचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. यावेळी सोनाक्षी, तिचे आई-वडील आणि झहीर एकत्र दिसले. तर, शत्रुघ्न सिन्हांनी सोनाक्षीच्या लग्नापूर्वी पहिल्यांदाच होणारा जावई झहीर इक्बालसोबत पोजेसही दिल्या आहेत. शत्रुघ्न यांना पापाराझींनी थांबून पोजेस देण्यास सांगितलं असता ते ‘खामोश’ असं म्हणाले.

टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत शत्रुघ्न सिन्हाने सांगितले की, "मला सांगा, नेमकं आयुष्य कोणाचं आहे ? सोनाक्षी माझी एकुलती एक लेक आहे. माझ्या लाडक्या लेकीचं हे आयुष्य आहे. मला तिचा खूप अभिमान असून मी तिच्यावर प्रचंड प्रेम करतो. ती मला तिच्या आयुष्यातील भक्कम आधारस्तंभ समजते. मी नक्कीच माझ्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. मी नेहमीच तिच्या आनंदात सहभागी होतो, तिचा आनंद तोच माझाही आनंद... तिला तिचा जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ती तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकते."

शत्रुघ्न सिन्हा यांनी मुलाखतीमध्ये पुन्हा सांगितले की, "मी दिल्लीत माझ्या राजकीय कामांसाठी आहे. मी मुंबईमध्ये फक्त तिची (सोनाक्षी सिन्हाची) ताकद म्हणून नाही तर तिचं सुरक्षाकवच म्हणून मुंबईमध्ये आहे. सोनाक्षी आणि झहीरला एकत्र राहायचे आहे, ते एकत्र छान दिसतात. अनेक जण खोटी माहिती पसरवत आहेत, कृपया खोटी माहिती पसरवणे थांबवा."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karjat Tourism : हिरव्यागार जंगलात लपलेला सुंदर धबधबा, पावसाळ्यात वीकेंड येथेच प्लान करा

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र आळंदीमध्ये भक्तिरसाचा अपार उत्सव

Breakfast Recipe: वाटीभर रव्यापासून बनवा 'हा' हेल्दी नाश्ता, टिफिनसाठी सुद्धा ठरेल बेस्ट

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT