Kesari Chapter 2 Trailer: अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी चैप्टर 2' या चित्रपटाचा ट्रेलर 3 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. हा 3 मिनिटे 2 सेकंदांचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल. या चित्रपटात अमृतसरच्या जलियांवाला बाग हत्याकांडाची अनभिज्ञ कथा उलगडण्यात आली आहे.
'केसरी चैप्टर 2' मध्ये अभिनेता अक्षय कुमार सी. शंकरन नायर यांची भूमिका साकारत आहेत. ज्यांनी 1919 मध्ये झालेल्या जलियांवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा दिला होता. या हत्याकांडात हजारो भारतीयांना गोळ्या घालून ठार करण्यात आले होते, ज्याचे निशाण आजही त्या बागेच्या भिंतींवर दिसतात. चित्रपटात आर. माधवन ब्रिटिश साम्राज्याच्या वकिलाची भूमिका साकारत असून,तो अक्षय कुमारसोबत न्यायालयात संघर्ष करताना दिसेल.तसेच चित्रपटात अनन्या पांडेचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
'केसरी चैप्टर 2' हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. करण सिंग त्यागी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर ट्विटरवर 'केसरी चैप्टर 2' हा ट्रेंड सुरू झाला असून, चाहत्यांनी अक्षय कुमारच्या दमदार पुनरागमनाचे कौतुक केले आहे.
2019 साली प्रदर्शित झालेल्या 'केसरी' या चित्रपटात अक्षय कुमारने हवालदार ईशर सिंग यांची भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये सारागढीच्या युद्धाची कथा दाखवण्यात आली होती. आता 'केसरी चैप्टर 2' मध्ये जलियांवाला बाग हत्याकांडाची हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.