Kedar Shinde Special Offer For Biapan Bhari Deva  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde Offer For Movie : केदार शिंदेची पुरुषांसाठी भन्नाट ऑफर; १०० रुपयात पाहता येणार 'बाईपण भारी देवा' चित्रपट

Baipan Bhari Deva : दिग्दर्शक केदार शिंदेंची प्रेक्षकांसाठी स्पेशल ऑफर.

Pooja Dange

Kedar Shinde Announce Special Offer For Baipan Bhari Deva Movie

बाईपण भारी देवा चित्रपटाची सर्वत्र चर्च आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कमाई केली आहे. अगदी सचिन तेंडुलकरला देखील या चित्रपटाची भुरळ पडली आहे.

फक्त महाराष्ट्रात नाहीतर तर महाराष्ट्राबाहेर देखील सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी होती. हैदराबादमधील चित्रपटगृह सुद्धा या चित्रपटामुळे हाऊसफुल्ल झाले होते.

बाईपण भारी देवा चित्रपटाची क्रेझ पाहता दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रेक्षकांसाठी एक ऑफर आणली आहे.

बाईपण भारी देवा चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी म्हटले आहे की, 'हा सिनेमा "तिने" डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तिचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तिचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय....' (Latest Entertainment News)

केदार शिंदे यांनी पुरुषांसाठी स्पेशल ऑफर आणली आहे. समस्त पुरुष वर्गाला बाईपण भारी देवा चित्रपट १०० रुपयात पाहता येणार आहे.

बाईपण भारी देवा चित्रपटाने ८० कोटींचा गल्ला पार केला आहे. तर या ऑफरमुळे चित्रपट १०० कोटींचा गल्ला देखील लवकर पार करेल अशी अपेक्षा नेटकरी करत आहेत.

बाईपण बारी देवा चित्रपटाच्या या टप्पाच्या वाटेत २ बॉलिवूड चित्रपट आहेत. ज्या दिवसापासून केदार शिंदे यांची ही ऑफर सुरु होणार आहे त्याचदिवशी बॉलिवूडचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. सनी देओल आणि अमिषा पटेचा गदर २ आणि अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि हुमा कुरेशी यांचा ओ माय गॉड २. या चित्रपटनमुळे बाईपण... १०० कोटींच्या प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो.

बाईपण भारी देवाच्या यशानंतर केदार शिंदे नवीन चित्रपटाच्या तयारीला लागले आहेत. वैशाली नाईक आणि ओंकार दत्त यांच्यासोबत एक नवीन कलाकृती घेऊन केदार शिंदे आपल्या भेटीला येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

SCROLL FOR NEXT