Merry Christmas Movie Instagram @Katrinakaif
मनोरंजन बातम्या

Katrina Kaif-Vijay Sethupathi: कतरिना कैफ- विजय सेतुपतीच्या 'मेरी ख्रिसमस'ची तारीख पुढे ढकलली; नेमकं कारण काय?

Merry Christmas Movie: 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Merry Christmas Movie Release Date:

बॉलिवूडची बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री म्हणजे कतरिना कैफ. कतरिना नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते. ती सध्या तिचा आगामी चित्रपट 'मेरी ख्रिसमस'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे साउथचा सुपरस्टार विजय सेतुपती आणि कतरिना कैफ ही जोडी.

कतरिना कैफ आणि विजय सेतुपति पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा 'मेरी ख्रिसमस' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विजय सेतुपती आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'मेरी ख्रिसमस' १२ जानेवारी २०२४ रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात रिलीज होणार होता. परंतु डिसेंबर महिन्यात बॅक टू बॅक दमदार चित्रपट प्रदर्शित होत असल्याने निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे.

कतरिना आणि विजय सेतुपती यांच्या मेरी ख्रिसमस चित्रपटात मराठमोळी राधिका आपटे दिसणार आहे. राधिकाने आज चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे.

'मेरी ख्रिसमस' चित्रपटासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहे. विजय सेतुपती आणि कतरिना कैफ ही जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या दोघांची केमिस्ट्री बघायला प्रेक्षक आतुर असल्याचे दिसत आहे.

कतरिनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना नुकतीच 'टायगर ३' चित्रपटात झळकली होती. तर विजय सेतुपती 'जवान' चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

SCROLL FOR NEXT