Katrina Kaif  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Merry Christmas: सुट्टी संपली आता पुन्हा शूटिंग; कतरिना कैफचे फोटो झाले व्हायरल

व्हॅकेशनहून परत आल्यावर कतरिना आणि विकी दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ(Katrina Kaif) सध्या तुफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती आणि तिचा पती अभिनेता विकी कौशल मालदीवहून परतले आहेत. हे कपल मालदीवला कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवारासोबत गेले होते. या मालदीव व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. व्हॅकेशनहून परत आल्यावर कतरिना आणि विकी दोघेही आपल्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यग्र झाले आहेत. कतरिना कैफ सध्या तिचा आगामी सिनेमा 'मेरी ख्रिसमस'(Merry Christmas)चे शूटिंग करत असून, त्याचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. कतरिनाने तिच्या इन्स्टाग्राम हॅंडलवरून ते शेअर केले आहेत.

कतरिनाने सोमवारी सकाळी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सहभिनेता विजय सेतुपती आणि दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्या सोबतचे 'मेरी ख्रिसमस' या तिच्या आगामी सिनेमाच्या रिहर्सलचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना, 'मेरी क्रिसमस वर्क इन प्रोसेस', असे कतरिनाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

'मेरी ख्रिसमस' ची निर्मिती रमेश तौरानी यांच्या टिप्स इंडस्ट्रीजने मॅचबॉक्स पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने केली आहे. कतरिनाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना सलमान खानच्या 'टायगर ३' आणि 'फोन भूत' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत दिसणार आहे.

कतरिनाला धमकी

अलीकडेच, कतरिना कैफला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. एक अज्ञात व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करून जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. विकी कौशलने त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला, तरीही ती अज्ञात व्यक्ती वारंवार कतरिनाला धमकी देत राहिली. अखेर कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी या अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guru Gochar: 12 वर्षांनंतर गुरु ग्रह बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार चांगली संधी

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर कुणी फेकला रंग? खोडसाळपणा की महाराष्ट्र पेटवण्याचा डाव?

अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी; तोंडाशी मुलीचं लग्न,यवतमाळमधील शेतकऱ्याच्या मदतीला धावले आमदार शिवतारे, उचलणार लग्नाचा खर्च

Maharashtra Politics: फडणवीसांनी फुंकलं पालिकेचं रणशिंग, ठाकरे ब्रँडवरून राजकारण पेटलं, कुणाचा ब्रँड? कुणाचा वाजणार बँड?

वेळ येणार, धरणे आणि संपूर्ण जम्मू-काश्मीर...; पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडची भारताला धमकी

SCROLL FOR NEXT