Vicky Kaushal and Katrina Kaif  Saam Tv
मनोरंजन बातम्या

कतरिना कैफला अज्ञात व्यक्तीकडून धमकी; विकीची पोलिसांत धाव

अज्ञात व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करत होता

सुरज सावंत

मुंबई - बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि त्याची पत्नी अभिनेत्री कतरिना कैफला (Katrian Kaif) जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. या प्रकरणी विकी कौशल याने अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्ती बऱ्याच दिवसांपासून कतरिनाला सोशल मीडियावर स्टॉक करत होता आणि विक्की कौशलने त्या व्यक्तीला समजवण्याचा प्रयत्न केला होता, तरीही तो असे करत राहिला आणि शेवटी विकी कौशलला हे पाऊल उचलावे लागले.

अभिनेता विकी कौशलनं सांताक्रूझ पोलीस स्टोशनमध्ये या व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कतरिना कैफला एक व्यक्ती सोशल मीडियावर स्टॉक करत होता. या व्यक्तीच्या विरोधात विकीनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचे नाव सोशल मीडियावर आदित्य राजपूत आहे, मात्र ते त्याचे खरे नाव आहे की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला असून पोलीस धमकी देणाऱ्या अज्ञात इसमाचा शोध घेत आहे. अभिनेत्री कतरिना कैफचे अनेक चाहते आहेत. विकी कौशलचे रोमँटिक फोटोज बघता विकी आणि कतरिनाची लव केमिस्ट्री दमदार असल्याचे कळते. अनेक वेळा काही युझर्स सेलिब्रिटींना सोशल मीडियावर स्टॉक करतात. कतरिनाला देखील आदित्य राजपूत नावाचा एक मुलगा सोशल मीडियावर स्टॉक करत होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांना धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यामुळं सावधगिरी बाळगत या जोडीनं सांताक्रुझ पोलीस स्थानकात सदर प्रकरणी तक्रारही दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT