Shehzada Box Office Collection Instagram @kartikaaryan
मनोरंजन बातम्या

Shehzada 1st Day Collection: कार्तिक आर्यनच्या 'Shehzada'चा 'पठान'समोरही गाजावाजा

'भूल भुलैया' चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत.

Pooja Dange

Shehzada Movie Box Office Collection: कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन यांचा 'शेहजादा' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला. हॉरर कॉमेडी असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिस पहिल्या दिवशी काय कमल केली आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतील. परंतु 'पठान' चित्रपट आजही बॉक्स ऑफिसवर तग धरून आहे आणि याच परिणाम 'शेहजादा' चित्रपटावर नक्कीच होईल असे म्हटले आजच्या आहे.

'भूल भुलैया' चित्रपटाच्या यशानंतर कार्तिक आर्यनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे त्याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट 'शेहजादा'कडून अनेकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची सुरूवात खूपच संथ झाली.

चित्रपटाचे एकूण बजेट ८५ कोटी रुपये आहे, असे म्हटले जात आहे. सुरुवातीला मिळालेल्या आकड्यांनुसार चित्रपटाने काल म्हणजे पहिल्या दिवशी 6.50 कोटी ते 7.25 कोटी कमाई केली आहे. शेहजादासाठी सर्वोत्तम फेरिंग सेंटर दिल्ली होते, त्यानंतर मुंबई होते.

पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या तीन नॅशनल चैनला पहिल्या दिवशी अंदाजे 3.60 कोटी, तर नॉन-नॅशनल चेनने 3.25 कोटी रुपयांची कामे केली आहे. बाय वन गेट वन फ्री ऑफरमुळे ओपनिंग डे याचा फायदा झाला. तिकिटांची अधिक विक्री व्हावी यासाठी कार्तिक आर्यन आणि भूषण कुमार यांच्या मार्केटिंग ब्रेनचा शेवटच्या क्षणाचा हा मास्टर स्ट्रोक होता.

आज शनिवार आहे तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुट्टी आहे. त्यामुळे याचा 'शेहजादा' चित्रपटाला नफा कमाविण्यासाठी होऊ शकतो. 'शेहजादा'ची ओपनिंग भेडिया, एक व्हिलन रिटर्न्स सारखीच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा फटका; अन्न-पाण्याच्या शोधात शेतशिवारात मोरांची भटकंती

Office Desk Vastu: नोकरीत नवी संधी आणि प्रमोशन मिळत नाहीये? ऑफिसच्या डेस्कवरून या गोष्टी लगेच काढून टाका

मुंबई-पुणे मिसिंग लिंक ठरतोय गेमचेंजर; १० दिवसांत नेमकं काय चित्र बदललं? महत्वाची माहिती समोर

NEET UG Exam: मोठी बातमी! नीट पेपर फुटी प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, नाशिकमधून एकाला ताब्यात घेतलं

Hypertension Symptoms: शरीरात दिसतायत ही ५ बदलती लक्षणं? वेळेत ओळखा वाढलेल्या ब्लड प्रेशरचा धोका

SCROLL FOR NEXT