Kartik Aaryan In Hera Pheri 3 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kartik Aaryan: कार्तिक आर्यनने केले अक्षय कुमारला रिप्लेस; 'या' आयकॉनिक चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये झळकणार कार्तिक

'हेरा फेरी 3'मध्ये कार्तिक आर्यन काम करणार असल्याची बातमी खरी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Hera Pheri 3 Update: हेरा फेरी आणि फिर हेरा फेरी या विनोदी चित्रपटांनी प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले आहे. हे दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी आजही प्रेक्षक उत्सुक असतात. या चित्रपटातील तीन पात्र श्याम, बाबुराव आणि राजू यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. प्रेक्षकांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. हेरा फेरी चित्रपटाचा तिसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु या आगामी चित्रपटामध्ये अक्षय कुमार राजुची भूमिका करणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

फिरोज नाडियाडवाला यांचा तीन विनोदी चित्रपटांचा अक्षय कुमार मुख्य भाग आहे. हेरा फेरी, आवरा पागल दिवाना आणि वेलकम या चित्रपटांच्या नवीन भाग बनवताना नेहमीच अक्षय कुमार प्रथम प्राधान्य राहिला आहे. परंतु यावेळी मात्र अक्षय कुमारने हेरा फेरी या चित्रपाटाच्या तिसऱ्या भागात काम करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. अक्षयला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली नसल्याने तो चित्रपटात काम करण्यास तयार होत नाहीये, असे एक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती समोर आले आहे. (Akshay Kumar)

अक्षय कुमार चित्रपटात नसल्यास त्याच्याऐवजी चित्रपटामध्ये कोण काम करणार याची चर्चा सुरू होती. परंतु दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी दिलेल्या उत्तराने हे स्पष्ट झाले आहे की, कार्तिक आर्यन अक्षय कुमारची जागा घेणार आहे. परेश रावल यांना एका चाहत्याने ट्विटरवर विचारले होते की, 'हेरा फेरी 3'मध्ये कार्तिक आर्यन काम करणार असल्याची बातमी खरी आहे का? त्यावर परेश रावल यांनी ही बातमी 'एकदम खरी' असल्याचे म्हटले आहे. परंतु निर्माते आणि कार्तिक आर्यन यांच्याकडून कोणतीच अधिकृत माहिती समजलेली नाही. (Actors)

Hera Pheri 3 Update

कार्तिक आर्यनने या आधीही अक्षय कुमारच्या भूल भुलय्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम केले आहे. त्याचा हा चित्रपट खूप हिट ठरला. 'रूह बाबा' हे भूल भुलय्या चित्रपटातील कार्तिकचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्यामुळे कदाचित 'हेरा फेरी 3'मध्ये सुद्धा अक्षय कुमार ऐवजी कार्तिकचा विचार करण्यात येत आहे. (Comedy)

कार्तिक आर्यन सध्या त्याच्या फ्रेडी चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'कॅप्टन इंडिया', 'सत्य प्रेम की कथा' आणि 'आशिकी 3' या चित्रपटांमध्येही कार्तिक दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : नगर-पुण्यानंतर कल्याणमध्ये बिबट्याची दहशत, कुत्रे-जनावारांवर हल्ला, नागरिकांसमोर मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Live News Update : राष्ट्रीय पातळीवरील 38 वी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा पुढे ढकलली

Kitchen Cleaning Hacks : किचनमधील मळकट भांड्यांना पुन्हा नवीन चमक द्या, आताच ट्राय करा घरगुती उपाय

Priyanka Chopra : पिवळी साडी, हातात बंदूक अन् पायात कोल्हापूरी; देसी गर्ल महेशबाबूसोबत करणार ॲक्शन

Milk Malai Benefits For Skin: दुधाची साय चेहऱ्याला लावा, कोरडी त्वचा होईल मऊ अन् मुलायम

SCROLL FOR NEXT