Kartik And mystery Girl: बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा "तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी" हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटातील कार्तिक आणि अनन्या पांडे यांच्या रोमँटिक जोडीचे सर्वत्र कौतुक झाले आहे. कार्तिक त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यासाठी नेहमीच चर्चेत असतो, अनेकदा त्याचे नाव कोणत्या ना कोणत्या सुंदर मुलीशी जोडले जाते.
अलीकडेच, कार्तिकचे त्याच्या गोव्यातील सुट्टीतील फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून नेटकऱ्यांनी असा दावा केला की आर्यन या १८ वर्षीय युके रहिवासी करीना कुबिलियटसोबत तो गोव्यात होता. पण, या वृत्तांनंतर, करीनाने त्याची गर्लफ्रेंड असल्याचे नाकारले. मात्र कार्तिक या प्रकरणावर शांतच आहे. पण, एका सूत्राने उघड केले आहे की सुट्टीदरम्यान दोघेही एकाच हॉटेलमध्ये होते.
एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्सला सांगितले की, "हो, कार्तिक आणि मिस्ट्री गर्ल एकाच वेळी एकाच गोव्यातील हॉटेलमध्ये होते. परंतु वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहिले होते." तसेच, दोघेही ज्या हॉटेलमध्ये राहिले होते त्या हॉटेलच्या स्टाफनेही याची माहिती दिली होती. पण, कार्तिक आर्यन सध्या या वृत्तांवर पूर्णपणे मौन आहे. त्याच्याकडून कोणत्याही प्रकारचे विधान आलेले नाही.
कार्तिक आणि मिस्ट्री गर्लच्या डेटिंगबद्दल करिनाने स्वत: खुलासा केला आहे.करिनाने खुलासा करत तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते की, 'मी कार्तिक आर्यनची गर्लफ्रेंड नाहीये. गप्प बस.' यामुळे कार्तिक आणि करिना रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवांना पूर्णविराम लागला. विशेष म्हणजे, कार्तिक आर्यनचे नाव यापूर्वी सारा अली खान, जान्हवी कपूर, नुसरत भरुचा आणि अनन्या पांडे यांच्याशी जोडले गेले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.