Darshan Did Puja At Wife's Flat After Fan's Murder Saam Tv
मनोरंजन बातम्या

Renuka Swamy Case Update : रेणुकास्वामी हत्येप्रकरणी दर्शनच्या पत्नीची चौकशी, घरातून मिळाले महत्वाचे पुरावे

Darshan Did Puja At Wife's Flat After Fan's Murder : रेणुकास्वामी हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती नवीन माहिती समोर आली आहे. अभिनेता दर्शनच्या फ्लॅटवरून पोलिसांनी काही महत्वाचे पुरावे जप्त केले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेणुकास्वामी हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. या प्रकरणामध्ये असलेला मुख्य आरोपी अभिनेता दर्शन याचे शुज पत्नी विजयालक्ष्मीच्या फ्लॅटवरून जप्त करण्यात आलेले आहे. या प्रकरणामध्ये सबळ पुरावा म्हणून पोलिसांनी रेणुकास्वामीचे शुज ताब्यात घेतले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, अभिनेता दर्शन याची पत्नी विजयालक्ष्मी हिची नुकतीच पोलिसांनी चौकशी केली आहे. या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, दर्शनाने रेणुकास्वामीची ८ जून रोजी हत्या केल्यानंतर, ९ जून रोजी दर्शन स्वत:च्या घरी गेला होता. यावेळी त्यांनी दोघांनीही एकत्र पूजाही केली. त्यानंतर दर्शन ११ जून रोजी म्हैसूरला गेला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, दर्शनची पत्नी विजयालक्ष्मी हिची बुधवारी (19 जून 2024) अन्नपूर्णेश्वरी नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी चौकशी केली होती. तब्बल ५ तास पोलिसांनी हिची चौकशी केली होती. विजयालक्ष्मी यांना रेणुकास्वामी हत्येप्रकरणी काही माहिती असेल तर त्यांनी सांगावे, असे पोलिसांनी सांगितले. तुला रेणुकास्वामीच्या अपहरण आणि हत्येबद्दल काही माहिती आहे का ? दर्शनने या घटनेबद्दल तुला माहिती दिली आहे का ? या घटनेनंतर दर्शन फ्लॅटमध्ये का आला होता ? असे अनेक वेगवेगळे प्रश्न पोलिसांनी विजयलक्ष्मीला विचारले.

विजयालक्ष्मी यांच्या घरातून पोलिसांनी दर्शनचे शुजही जप्त केले आहेत. हे शुज त्याचेच आहेत की, दुसरे कोणाचे आहेत ? हे शुज जर त्याचेच असतील तर दर्शनने घटनेच्या दिवशी हे शुज घातलेले आहेत का ? या संपूर्ण प्रकरणात हे महत्त्वाचे पुरावे मानले जात आहेत. दर्शनाची चप्पल अन्य कोणी वापरली होती का, धुतली होती का किंवा पुसली होती का ? असेही प्रश्न पोलिसांनी विजयालक्ष्मी यांच्याकडून घेतली.पोलिसांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर विजयालक्ष्मीने दिलेले आहेत. विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दर्शनची पत्नी विजयलक्ष्मी हिला या प्रकरणाची साक्षीदार म्हणून आणखी काही तिच्याकडून माहिती घेण्याची शक्यता आहे.

पोलीस आयुक्त बी दयानंद यांच्या नेतृत्वाखाली रेणुकास्वामी हत्या प्रकरणासंबंधित महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहे. रेणुकास्वामीच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा गौडा यांचा बचाव करणाऱ्या वकिलांनी पोलिस कोठडी वाढवण्याबद्दल न्यायालयात युक्तिवाद केला होता. दर्शन आणि त्याची मैत्रिण पवित्रा गौडा यांच्यासह ११ साथीदारांना ३३ जणांच्या निर्घृण हत्येप्रकरणी २० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT