Kareena Kapoor SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor : "पागल करते हो तुम लोग"; तिसऱ्या प्रेग्नेंसीच्या अफवांवर करीना कपूर खाननं सोडलं मौन, VIDEO समोर

Kareena Kapoor 1st Reaction On Pregnancy Rumours : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने प्रेगनेंसी अफवांवर अखेर मौन सोडले. तिने मजेशीर पद्धतीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ती नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

बॉलिवूडची बेबो गेल्याकाही दिवसांपासून आपल्या प्रेगनेंसी अफवांमुळे चांगलीच चर्चेत आहे. करीना कपूरचा जीम बाहेरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि त्यानंतर करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याची चर्चा सुरू झाली. अशात आता करीना कपूर खानने सोशल मीडियावर एका मिश्किल पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाबाबतच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

२१ ऑगस्ट रोजी मुंबईतील एका जिममधून बाहेर पडतानाचा करीना कपूरचा व्हिडिओ समोर आल्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या अफवांना सुरुवात झाली होती. व्हिडिओमध्ये तिचा 'बेबी बंप' दिसत असल्याचा दावा करण्यात आला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याचा अंदाज लावला होता.

करीनाची टीम आणि तिची नणंद सबा पटौदी यांनी हे दावे त्वरित फेटाळून लावले होते. आता खुद्द अभिनेत्रीनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. करीनाने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक मजेशीर छायाचित्र शेअर केले, ज्यामध्ये एक व्यक्ती आपले फुगलेले पोट दाखवताना दिसत आहे. या पोस्टच्या पार्श्वभूमीवर 'हम आपके हैं कौन..!' चित्रपटातील 'चॉकलेट लाइम ज्यूस' हे गाणे वाजताना ऐकू येते. त्यासोबत स्टोरीवर हसण्याचे, पिझ्झाचे इमोजी वापरले आहेत. तसेच त्या स्टोरीवर "Hat nah be" असं देखील लिहिलं आहे.

Kareena Kapoor Khan

गरोदरपणाच्या चर्चा सुरू झाल्यापासून अभिनेत्री नुकतीच पहिल्यांदाच मुंबईत स्पॉट झाली. पिवळ्या रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँटमध्ये करीना कपूर खूपच कमाल दिसत होती. पापाराझींनी तिला घेराव घातला असता, अफवांमुळे निर्माण झालेल्या या गोंधळावर प्रतिक्रिया देताना ती गमतीने म्हणाली, "तुम्ही लोक वेडं करता." त्यानंतर हसत करीना गाडीत बसून गेली.

करीनाचा आगामी चित्रपट

करीना कपूर आणि सैफ अली खान यांना तैमूर आणि जहांगीर अशी दोन मुले आहेत. करीना कपूर लवकरच 'दायरा' (Daayra) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा मेघना गुलजार दिग्दर्शित चित्रपट असून क्राईम थ्रिलर ड्रामा आहे. यात पृथ्वीराज सुकुमारन यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO ची विशेष मोहीम! कर्मचाऱ्यांना मिळणार PF, EPS आणि EDLIचा लाभ, ३१ ऑक्टोबर पर्यंत करून घ्या 'हे' काम

Low blood pressure: अचानक BP लो झालाय? डॉक्टरकडे जाण्यापूर्वी घरच्या घरी करा हे 5 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पाहणी

Maharashtra Farmer : २ एकरात ३ पिके अन् १५ लाखांचे उत्पन्न, शेतकऱ्याचा 'हा' फॉर्म्युला पाहून कृषी तज्ञही चक्रावले

'त्या' महिलेची अशी प्रसूती तुम्ही कधीच ऐकली नसेल! ३ बाळांच्या जन्माने डॉक्टरही झाले चकित...

SCROLL FOR NEXT