Kareena Kapoor On Her Marriage Saam TV
मनोरंजन बातम्या

Kareena Kapoor Interview: करीना कपूरने सैफ अली खानसोबत लग्न का केलं?, खुद्द बेबोनेच सांगितलं कारण

Kareena Kapoor News: अभिनेत्री करीना कपूरने नुकतंच सैफसोबतच्या डेटिंग आणि लग्नावर मनमोकळेपणाने उत्तरं दिलं आहे.

Chetan Bodke

Kareena Kapoor On Her Marriage

बॉलिवूडची बेबो म्हणून प्रसिद्ध असलेली करीना कपूर खान सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. अलीकडेच, करिनाने कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. करणने जेव्हा, करीनाला ‘गदर २’ फेम अभिनेत्री अमिशा पटेलबद्दल प्रश्न विचारला होता, त्यावेळी तिने दिलेलं उत्तर चर्चेत आलं होतं. त्यानंतर तिला सैफबद्दलच्या लग्नावरुन विचारलेल्या प्रश्नामुळे ती चर्चेत आली आहे. यावेळी अभिनेत्रीने मुलाखतीत सैफसोबतच्या डेटिंग आणि लग्नावर मनमोकळेपणाने उत्तरं दिली.

मीडियासोबत बोलताना करिना कपूरने सांगितले, “लग्न करण्याचे एकमेव कारण म्हणजे आपण आपला वारसा पुढे सुरू ठेवावा आणि परिवाराची वाढ व्हावी. आम्ही दोघांनीही एकमेकांना पाच वर्ष डेट केल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला. आम्ही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि पुढचे पाऊल उचलले. कारण, आम्हाला दोन मुलं हवी होती.” सोबतच यावेळी अभिनेत्रीने मुलाखतीत ती आपल्या मुलांवर कशाप्रकाचे संस्कार करते, यावरही भाष्य केले आहे. (Bollywood)

“आम्ही दोघेही मुलांना आदरपूर्वक वागणूक देतो. आम्ही त्यांचा नेहमीच सन्मान करतो. त्यांना जसे वागायचे आहे, जसे राहायचे आहे, तसं त्यांना आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो. मुलं खूपच शांत स्वभावाची असतात. मला माझ्या मुलांसोबत रहायचे आहे. मला त्यांच्यासोबत प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा आहे. मी नेहमीच माझ्या मुलांना आनंदी ठेवेल, तेव्हाच त्यांची भरभराट होईल.” असं अभिनेत्री त्या मुलाखतीमध्ये म्हणाली. करीना कपूर आणि सैफ अली खानने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. २०१६ मध्ये पहिला मुलगा तैमूर अली खानचा तर २०२१ मध्ये दुसरा मुलगा जेह अली खानचा जन्म झाला.

करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्री करीना कपूर खान रोहित शेट्टीच्या ‘सिंघम ३’ मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सुजॉय घोष दिग्दर्शित ‘जाने जाने’ या चित्रपटामध्ये करीनाने प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये करीनासोबत जयदीप अहलावत आणि विजय वर्माने काम केले होते. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यातील रुग्णवाहिका वाहन चालक आक्रमक

Maharashtra Cabinet Decision: फडणवीस सरकारचा सर्वात मोठा निर्णय, भूसंपादन मोबदल्याच्या व्याजदरात केला बदल

शिंदेंना मुख्य नेता हे पद कुणी दिलं? धनुष्यबाण दिलाच कसा?, ठाकरेंच्या वकिलांचा आयोगावर शाब्दिक बॉम्ब, कोर्टात काय झालं?

क्रिकेटर अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप

गटारी स्पेशल! घरी अर्ध्या तासात बनवा चटपटीत आणि कुरकुरीत 'पनीर कबाब'

SCROLL FOR NEXT