Famous Actor Divorce SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Actor Divorce : २० वर्षांच्या संसारानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट? अखेर त्याने सोडले मौन, म्हणाला...

TV Actor Divorce : टिव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अभिनेत्याने यासंबंधित स्वतः मोठा खुलासा केला आहे.

Shreya Maskar

टिव्ही इंडस्ट्रीच्या अभिनेत्याचा घटस्फोट होणार

२० वर्षांच्या संसार मोडणार

सोशल मीडियावर घटस्फोटाची चर्चा

टिव्ही विश्वातील प्रसिद्ध जोडी अभिनेता करणवीर बोहरा आणि अभिनेत्री तीजय सिद्धू गेल्याकाही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर दोघांच्या घटस्फोटांच्या चर्चा रंगल्या आहेत. लग्नाच्या २० वर्षांनी करणवीर बोहरा आणि तीजय सिद्धू वेगळे होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे बोले जात आहे. अशात आता स्वतः अभिनेता करणवीर बोहरा यांनी आपल्या नात्याबद्दल स्पष्ट वक्तव्य केले आहे.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले की, "मला या विषयावर सध्या काहीही बोलायचे नाही. जेव्हा मला एखाद्या गोष्टीवर चर्चा करायची नसते, तेव्हा मी नम्रपणे तसे सांगतो आणि लोकांनाही त्याचा आदर करावा असे मला वाटते." अशा चर्चा किंवा अफवांचा सामना कसा करता, या प्रश्नावर ते म्हणाले, "मी कशाचाही मनावर ताण घेत नाही. अगदी नेटिझन्सनी काही वाईट किंवा कठोर टीका केली, तरी मला त्याचे वाईट वाटत नाही." त्यामुळे घटस्फोटासंबंधित कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

वैयक्तिक आयुष्य

करणवीर बोहराने नोव्हेंबर 2006 रोजी बेंगळुरू येथे तीजय सिद्धूशी लग्नगाठ बांधली. यांना तीन मुली आहेत. दोघेही आपल्या मुलींसोबत कायम वेळ घालवताना दिसतात. तसेच दोघेही सोशल मीडियावर खूर सक्रिय असतात. आपल्या प्रोजेक्टची आणि वैयक्तिक आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट्स देतात.

करिअर

करणवीर बोहरा आणि तीजय सिद्धू दोघेही टिव्ही इंडस्ट्रीचा प्रसिद्ध चेहरा आहे. करणवीर बोहराने आजवर अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. 'कसौटी जिंदगी की', 'शरारत', 'कबूल है' आणि 'नागिन २' यांसारख्या मालिकांमध्ये त्यांने काम केले आहे. तसेच तो 'बिग बॉस', 'खतरो के खिलाडी', 'नच बलिये', 'झलक दिखला जा' आणि 'लॉक अप' यांसारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ही झळकला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान मोठी घडामोडी! खासदार सुनील तटकरेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट; मोठा निर्णय होणार?

Fennel Seeds Milk Benefits For Back Pain: दुधात बडीशेप मिसळून पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, कंबरदुखी आणि थकवा होईल झटपट दूर

भाजपची मोठी कारवाई; ३ बड्या नेत्यांना ६ वर्षांसाठी केले निलंबित

Rice Cause Diabetes: भात खाल्ल्याने खरंच मधुमेह होतो? हे वाचा, सर्वात मोठा गैरसमज होईल दूर

Classic 350 fuel tank capacity: किती लिटर पेट्रोलमध्ये फुल होते Classic 350 बुटेलची टाकी?

SCROLL FOR NEXT