Karan Johar: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने ५३व्या वर्षी त्याच्या एका खास शरीराच्या अवयवाचं इनशुरन्स करुन घेतल आहे. तेही थेट दक्षिण कोरियामध्ये जावून केली आहे. ही बातमी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
रेडिटवरील एका पोस्टनुसार, करण जोहर यांनी दक्षिण कोरियामध्ये जाऊन त्यांच्या चेहऱ्याचा इनशुरन्स करून घेतला आहे. या निर्णयामागे त्यांच्या एका जवळच्या मित्राचा सल्ला असल्याचेही सांगितले जाते. दक्षिण कोरियामध्ये चेहऱ्याचा इनशुरन्स करणे ही एक सामान्य बाब असल्याचेही या पोस्टमध्ये लिहिले आहे.
करण जोहरने या विषयावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे ही माहिती कितपत खरी आहे, हे स्पष्ट झालेले नाही. तथापि, सोशल मीडियावर या विषयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या निर्णयाचे कौतुक केले आहे, तर काहींनी यावर टीका केली आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, कर भावा, पैसे तुझे, चेहरा तुझा आहे..., तर, दुसऱ्याने लिहिले, पैसे असल्यावर लोक काहीही करु शकतात.
करण जोहरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो द ट्रेटर्स या शोची होस्टींग करणार आहे. हा शो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध द ट्रेटर्स या शोचा भारतीय व्हर्जन आहे. तसेच, धडक २ या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील तो करणार आहे.
Written By : Mrunmayi Samel
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.