Kapil Sharma New Show Stream On OTT Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kapil Sharma Show Promo: ‘घर बदला है, परिवार नहीं...’; कपिल शर्माचा नवा शो येतोय, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहाता येणार?

Kapil Sharma Show Promo: काही दिवसांपूर्वी ऑफ एयर झालेला कपिल शर्मा शो आता टेलिव्हिजनवर प्रदर्शित होणार नसल्याची माहिती स्वत: कपिल शर्माने दिली आहे.

Chetan Bodke

Kapil Sharma New Show Stream On OTT

कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा कायमच आपल्या कॉमेडीमुळे चर्चेत राहतो. ‘द कपिल शर्मा शो’मुळे कपिल शर्माच्या स्टारडममध्ये प्रचंड वाढ झाली. ‘द कपिल शर्मा शो’ कायमच टीआरपी चार्टवर पहिल्या क्रमांकावर असतो.

या शोला प्रेक्षकांकडून जरी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी, गेल्या काही दिवसांपूर्वीच या शोने चाहत्यांचा निरोप घेतला. शो पुन्हा कधी सुरु होणार याबद्दलची चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. नुकतंच शो विषयीची माहिती कॉमेडीयन कपिल शर्माने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नुकतंच कपिलने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे. अभिनेत्याने नव्या शोचा प्रोमो शेअर करताच सोशल मीडियावर त्याच्या शोची जोरदार चर्चा होत आहे. शेअर केलेल्या प्रोमोमध्ये, कपिल नव्या घरामध्ये दिसत आहे. त्याच्यासोबतच शोमधील सर्व कलाकारही पाहायला मिळत आहे. (Serial)

कपिलचा हा शो आता टेलिव्हिजनवर नाही तर, ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जेव्हा त्याने नव्या शोची घोषणा केली होती, तेव्हा त्याने नवं घर घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्याने शेअर केलेला हा प्रोमो तुफान व्हायरल होत आहे. (Bollywood)

कपिलने हा प्रोमो शेअर करताना “घर बदला है, परिवार नहीं! आता हा शो नेटफ्लिक्सवर पाहाता येणार आहे.” या आशयाचे कॅप्शन दिले आहे. कपिलची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रेक्षक सध्या कपिल शर्माच्या ह्या नव्या मालिकेसाठी खूपच उत्सुक असल्याचे सांगितले आहे. सोबतच यावेळी नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल देखील केलं आहे. (Entertainment News)

कपिल शर्माचा हा शो डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. टेलिव्हिजन दुनियेमध्ये भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर पहिल्यांदाच हा शो वेगळ्या प्रकारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. शो मध्ये कृष्णा अभिषेक, कीकू शारदा, राजीव ठाकूर आणि अर्चना पुरन सिंग हे देखील सहभागी होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रत्नागिरी - आंबा घाटात दरड कोसळली

Jyoti Chandekar: 'तू फसवलंस आजी...'; पूर्णा आजीला निरोप देताना 'ठरलं तर मग' परिवाराचे अश्रू अनावर

GK: स्मशानभूमीतून घरी परतल्यानंतर आपण आंघोळ का करतो?

Parali News : पुराच्या पाण्यात कार गेली वाहून; तिघांना वाचविण्यात यश, एकाचा शोध सुरू

Mumbai School Bus : माणुसकी! मुंबईला पावसाचा तडाखा, स्कूल बस अडकली पाण्यात, धो धो पावसात पोलिसांनी मुलांना वाचवले

SCROLL FOR NEXT