Kapil Sharma Wishes Krushna Abhishek His 40th Birthday  Instagram @kapilsharma
मनोरंजन बातम्या

Kapil Sharma Wishes Krushna: असाच जगाला हसवत राहा... कृष्णा अभिषेकसाठी कपिल शर्माची खास पोस्ट

Krushna Abhishek Birthday: कपिलने त्याचा सहकलाकार कृष्णा अभिषेकच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे.

Pooja Dange

Kapil Sharma Share Post For His Co-star : कपिल शर्मा हा कॉमेडी क्षेत्रातील बादशाह आहे. कॉमेडीच्या जोरावर त्यांचे स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. कपिल त्याच्या विनोद बुद्दीने प्रेक्षकांची मन जिंकत असतो. इतकंच नाही तर त्याच्या स्वभावामुळे देखील तो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

नुकतीच कपिलने त्याचा सहकलाकार कृष्णा अभिषेकच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे. इन्स्टाग्रामवरुन पोस्ट शेअर करुन कृष्णाला शुभेच्छा दिल्या आहेत. कपिल आणि कृष्ण अजुनही तितकेचं घट्ट मित्र आहेत, कुठल्याही कारणाने त्यांच्यातील प्रेम संपले नसून ते अधिक वाढले असल्याचे या पोस्टवरुन लक्षात येत आहे. (Latest Entertainment News)

कपिल शर्माच्या नवीन शोच्या सुरवातीला कृष्ण दिसला नव्हता. पण आता शोच्या उत्तरार्धात कृष्णाची पुन्हा एन्ट्री झाली आहे. मध्यंतरी तो शोमधून बाहेर गेला होता. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. परंतु आता या पोस्टमुळे या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे आणि ते दोघे खुप चांगले मित्र असल्याचे सिद्ध झाले आहे. कृष्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत कपिलने त्याचे कौतुकही केले आहे.

कपिलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले की, "वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा कृष्णा. नेहमी आनंदी रहा, निरोगी राहा आणि असचं जगाला हसवत रहा." कपिलच्या या पोस्टवर कृष्णाने कमेंट कर रिप्लाय देखील केला आहे, "धन्यवाद कप्पु, खुप प्रेम.खुपचं छान फोटो आहे आतापर्यंतचा."

कृष्णासाठी कपिलने केलेल्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंटस करत कृष्णाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची बायको ही मुंबईला तिच्या जुळ्या मुलांना घेऊन परतली आहे.

कृष्णा पुन्हा 'द कपिल शर्मा शो'मध्ये परत आल्याने प्रेक्षक खुश झाले आहेत. काही तांत्रिक अडचणीमुळे त्याने शो सोडल्याचे स्पष्ट केले असुन आता पुन्हा तो शोमध्ये दिसत आहे.

नुकतचं 'बीटी'शी बोलताना कृष्णा अभिषेक म्हणाला की, "हा बदल कॉन्ट्रॅक्टमध्ये झाला होता मनात नाही. आता हा सर्व प्रॉब्लेम नीट झाला असुन आता मी पुन्हा काम करण्यास सुरवात केली आहे. मला खुप आनंद आहे की,मी पुन्हा या कुटुंबाचा भाग आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: मुंबईसह ठाण्यात तुफान पाऊस, राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

कराचीत ५ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, २७ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं

Chocolate Waffle Recipe : बिस्किटांपासून बनवा चॉकलेट वॉफल, लहान मुलांचा आवडता पदार्थ १० मिनिटांत तयार

10 Hour Work Rule: सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! १० तासांची शिफ्ट, ५ दिवसांचा आठवडा

SCROLL FOR NEXT