'The Kapil Sharma Show' Kapil's Opinion Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kapil's Opinion About 'The Kapil Sharma Show': ‘द कपिल शर्मा शो’ अचानक का बंद होतोय? खुद्द कपिल शर्मानेच सोडलं मौन

‘द कपिल शर्मा शो’ला गेल्या तीन सीझनप्रमाणे चौथ्या सीझनलाही प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. काही दिवसांपासून चौथा सीझन देखील बंद होणार अशी चर्चा सुरू आहे.

Chetan Bodke

'The Kapil Sharma Show' Kapil's Opinion: ‘द कपिल शर्मा शो’ ने अनेक सेलिब्रिटींना नवी ओळख दिली. आपल्या उत्कृष्ट विनोदी शैलीने प्रेक्षकांना हसवत त्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले.

त्याच्या ‘द कपिल शर्मा शो’ची फॅन फॉलोइंग देखील बरीच मोठी आहे. गेल्या तीन सीझनप्रमाणेच या शोच्या चौथ्या सीझनलाही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा सीझन बंद होणार अशी अनेकदा चर्चा झाली आहे.

‘द कपिल शर्मा शो’चा चौथा सीझन जूनमध्ये बंद होणार असल्याची सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू आहे. लवकरच हा शो काही दिवसांसाठी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. आता अखेर कपिल शर्माने त्याच्या शोबद्दल मौन सोडले आहे.

ETimes ने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल म्हणतो, “अद्याप तरी, हा शो बंद होईल की नाही, याबाबत निश्चिती नाही. आम्हाला जुलै महिन्यात अमेरिकेत टुरसाठी जायचं आहे. तेव्हाचं तेव्हा ठरवलं जाईल. त्यामुळे यासाठी अद्याप फार वेळ आहे.” (Entertainment News)

कपिलचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर बरंच व्हायरल होत आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार, शो बंद करण्याबाबत अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. सोबतच शोमधील इतर कलाकार बाकी असलेले शूटिंग त्या दिवसात पूर्ण करणार असल्याची माहिती आहे. मात्र, कपिलने केलेल्या या वक्तव्यामुळे शो बंद होणार या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. (Latest Marathi News)

तथापि, प्रत्येक आठवड्याला कपिलच्या शोमध्ये अनेक वेगवेगळे सेलिब्रिटी येत असतात. तो त्याच्या शोमध्ये आपल्या खुमासदार शैलीत सर्वांनाच गप्प करतो. नुकतेच सलमानने त्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या निमित्ताने कपिलच्या शोमध्ये हजेरी लावली होती.(Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime News: मुंबईतून मुलांना कोण करतंय गायब? 36 दिवसांत 82 मुलं बेपत्ता

KDMC News: बेकायदेशीर उपायुक्त पदावरून संजय जाधव यांची हकालपट्टी, कल्याण डोंबिवली महापालिकेत खळबळ

सावधान! बिबट्यामुळे होणार रेबीज? तज्ज्ञांचं स्पष्ट मत

Mumbai Police: आनंदाची बातमी! कमी किंमतीत हक्काची घरं; पोलिसांच्या घरांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

भाजपमधील आयाराम महापालिकेत गॅसवर, भाजपच्या खेळीनं इच्छूक हवालदिल

SCROLL FOR NEXT