Kanatara 2 teaser out yandex
मनोरंजन बातम्या

Kantara 2 Teaser: 'कांतारा २' चा जबरदस्त टीझर प्रदर्शित, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

Kantara 2 Teaser out: ऋषभ शेट्टीचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'कांतारा २'चा पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. यावेळी सिनेमाची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. या टीझर मध्ये रिषभ शेट्टीचा खतरनाक लूक पाहायला मिळत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऋषभ शेट्टी चा 'कांतारा' सिनेमा २०२२ मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमाने बॅाक्स ऑफिसवर सगळे रेकॅार्ड मोडत कोटींची कमाई केली. या सिनेमाच्या यशानंतर कांतारा सिनेमाचे अभिनेते आणि दिग्दर्शक यांनी 'कांतारा २' ची घोषणा केली होती. या घोषणेनंतर चाहत्यांमध्ये 'कांतारा २' च्या रिलीजची उत्सुकता शिगेला गेली. बहुचर्चित सिनेमा 'कातांरा २'चा अखेर पहिला टीझर रिलीज करण्यात आला आहे. सिनेमाची रिलीज डेट घोषित केल्यानंतर काही तासांतच सिनेमाच्या मेकर्सनी 'कांतारा २ 'चा टीझर रिलीज केला आहे. आणि चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. या टीझरमध्ये अभिनेता ऋषभ शेट्टी खतरनाक लूकमध्ये दिसत आहे. ऋषभ शेट्टीचा हा लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

'कांतारा २' चा दमदार टीझर

टीझरच्या सुरुवातीला, तो क्षण आला आहे, दिव्य जंगल कुजबुजते आहे. असा आवाज ऋषभला ऐकू येताना दिसत आहे. बॅकग्राऊंडमध्ये, ऋषभ हातात मशाल घेऊन उभा आहे त्याला चारही बाजूने आगीने वेढले आहे. तेव्हा त्याला एक आवाज ऐकू येत आहे. प्रकाश! प्रकाशात सर्व काही दिसते. परंतु हा प्रकाश नाही, ती एक दृष्टी आहे, ही दृष्टी आपल्याया सांगते की, काल काय होत, काय आहे आणि भविष्यात काय होणार! हे दाखवणारी दृष्टी! तू बघू शकत नाही का ? रक्ताने माखलेले अंग , लांब केसं, गळ्यात रुद्राक्ष आणि हातात त्रिशूल घेऊन ऋषभ रहस्यमय अवतारात दिसत आहे. शेवटी चेहरा प्रकट होताना त्याच्या डोळ्यात आगीचे निखारे चमकताना दिसत आहे. टीझरवरुन कळत आहे की, ही गोष्ट कंदब राजवंश काळातील आहे.

ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि लिखित 'कांतारा' हा कन्नड सिनेमा पाच पेक्षा जास्त भाषेत रिलीज झाला होता. या सिनेमाने दमदार कामगिरी करत कोटींची कमाई केली होती. याचनंतर 'कांतारा २ 'ची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाच्या मेकर्सने 'कांतारा २ 'चा टीझर रिलीज केला आहे. या टीझरने काही तासातच सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. 'कांतारा २' सिनेमा , २०२२ मध्ये रिलीज झालेल्या कांताराचा प्रीक्वल आहे. याला 'कांतारा- अ लेजेंड चॅप्टर वन' (Kantara A Legend: Chapter 1) असं शीर्षक देण्यात आले आहे. हा टीझर ८२ सेकेंदाचा आहे. या टीझर मध्ये अभिनेता ऋषभ शेट्टीचा जबरजस्त लूक पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे लेखन -दिगदर्शन रिषभ शेट्टीने केले आहे. होम्बाले फिल्म्सच्या बॅनर मध्ये तयार झालेल्या 'कांतारा २' ला विजय किरागंदुर यांनी प्रोड्यूस केला आहे.

'या' दिवशी रिलीज होणार 'कांतारा २'

'कांतारा २' च्या टीझरसोबतच सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा सिनेमा पाहण्यासाठी चाहत्यांना पुढच्या वर्षापर्यंतची वाट पाहायला लागणार आहे. २ ऑक्टोबर २०२५ रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. हा सिनेमा, कन्नड,तेलुगू, तमिळ, मल्याळम, हिंदी, बंगाली आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे. 'कांतारा १' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केले होते. 'कांतारा २' चे लेखन आणि दिग्दर्शन सुद्धा ऋषभ शेट्टीने केले आहे. ऋषभ शेट्टीला कांतारा सिनेमासाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आले होते.

Edited by: Priyanka Mundinkeri

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

Diwali: दिवाळीच्या दिवशी 'या' ठिकाणी पणती लावा, देवी लक्ष्मी होईल प्रस्नन

KDMC निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसणार, बड्या नेत्याने उघडपणे जाहीर केली नाराजी

Mobile: मोबाईल चोरील गेल्यास 'तो' पुन्हा मिळवता येतो, त्वरित करा 'या' गोष्टी

SCROLL FOR NEXT