Kannada actor Umesh passes away  Saam tv
मनोरंजन बातम्या

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, सिनेविश्वात शोककळा

Actor Passes Away: चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

Shruti Vilas Kadam

Actor Passes Away: कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. यकृताच्या कर्करोगाशी झुंज देत त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.

यकृताच्या कर्करोगावर उपचार

कन्नड चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदी कलाकार एम.एस. उमेश यांचे रविवारी निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते घरी पडले त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांना यकृताचा कर्करोग आढळून आला. या आजारावर उपचार सुरू झाले. यकृताच्या कर्करोगाशी लढा दिल्यानंतर रविवारी वयाच्या ८० व्या वर्षी त्यांचे निधन झाले. उमेश यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत ३५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी मोठ्या पडद्यावर रजनीकांतसह अनेक प्रमुख दक्षिण भारतीय कलाकारांसोबत काम केले होते.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्रींनी वाहिली श्रद्धांजली

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार एचडी कुमारस्वामी यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर अभिनेत्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, "प्रसिद्ध विनोदी कलाकार श्री. एम.एस. उमेश यांच्या निधनाची बातमी ऐकून मला खूप दुःख झाले आहे. उमेश यांनी त्यांच्या विनोदाने प्रेक्षकांना हळहळून हासवले."

अभिनेते उमेश यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार

कन्नड अभिनेते उमेश यांच्या मुलीने सांगितले आहे की उमेश यांच्यावर अंत्यसंस्कार रविवारी होईल. ते तिच्या वडिलांचा मृतदेह रुग्णालयातून घरी घेऊन जात आहेत. त्यानंतर ते अधिक माहिती माध्यमांना कळवतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड गजा मारणेला १५ आणि १६ तारखेला पुणे शहरात येण्यास परवानगी

Cancer Risk In Men: सतत लघवी होतेय? साधी वाटणारी ही समस्या असू शकते कॅन्सरचं लक्षण; पुरुषांनी वेळीच सतर्क व्हा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपकडून मोठी कारवाई, बड्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीची तारीख आली समोर, आयोगाला कोर्टाने दिली पुन्हा मुदत, वाचा

The 50 Contestants: किम शर्मापासून धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहलपर्यंत; कोण-कोण असणार 'द 50'मध्ये? वाचा यादी

SCROLL FOR NEXT