Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Kangana Ranaut: महिलांच्या यशाकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनावर कंगना रणौतने प्रश्न उपस्थित केला आहे. महिलांच्या कर्तृत्वाऐवजी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची आणि चारित्र्याची चर्चा होणे चुकीचे असल्याचे तिने म्हटले.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महिलांच्या यशाकडे पाहण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित केला आहे. महिला एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाली किंवा एखाद्या प्रभावशाली पदावर पोहोचली की तिच्या कामगिरीपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याची आणि चारित्र्याची चर्चा का केली जाते, असा सवाल कंगना यांनी उपस्थित केला आहे.

महिलांच्या ‘Character Assassination’चा मुद्दा मांडताना कंगना यांनी समाजातील या मानसिकतेवर भाष्य केले. महिला आपल्या मेहनतीच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर पुढे जात असतानाही तिच्या यशाचे मूल्यमापन तिच्या कामाऐवजी वैयक्तिक आयुष्याच्या आधारे केले जाते, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

महिलांच्या चारित्र्यावरून टीका का?

कंगना यांच्या मते, जगभरातील महिलांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चारित्र्यावरून होणाऱ्या टीकेचा सामना करावा लागतो. एखादी महिला आपल्या क्षेत्रात मोठे यश मिळवत असेल, तर तिच्या कामाची दखल घेण्याऐवजी तिच्या खासगी आयुष्याशी संबंधित प्रश्न उपस्थित केले जातात. महिलांच्या बाबतीत अशा प्रकारची चर्चा होणे ही केवळ त्या व्यक्तीपुरती मर्यादित बाब नसून समाजाच्या विचारसरणीशी संबंधित असल्याचे कंगना यांनी म्हटले. महिलांच्या कर्तृत्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजकारण ते मनोरंजन

महिला राजकारण, मनोरंजन, व्यवसाय, प्रशासन किंवा अन्य कोणत्याही क्षेत्रात कार्यरत आहेत, तिच्या कर्तृत्वाचा आणि मेहनतीचा सन्मान केला गेला पाहिजे. तिच्या वैयक्तिक आयुष्यावर किंवा चारित्र्यावर चर्चा करण्यापेक्षा तिने मिळवलेल्या यशाला महत्त्व देणे आवश्यक असल्याचे कंगना यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT