Kangana Ranaut Fitness Transformation Instagram
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut Fitness: कंगनाचं नेक्स्ट मिशन जोमात, आगामी चित्रपटासाठी करतेय ‘अशी’ तयारी; ट्वीटरवरुन केला व्हिडिओ शेअर

Kangana Ranaut Fitness Transformation: ‘इमरजन्सी’ चित्रपटानंतर कंगना तिच्या आगामी चित्रपटासाठी ती खास बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करत आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut Video Viral: बॉलिवूडची पंगा गर्ल म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेली कंगना रनौत नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. आतापर्यंत कंगना आपल्यासमोर अभिनेत्री म्हणून भेटीला आली होती. आगमी चित्रपटात कंगना निर्माता आणि दिग्दर्शकाची भूमिका साकारणार आहे.

कंगनाचा ‘इमरजन्सी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आणीबाणीच्या काळावर आधारीत हा चित्रपट असून चित्रपटात कंगना देशाच्या माजी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधीची भूमिका साकारणार आहे. तिने चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावरुन शेअर केले आहे. कंगनाने नुकताच तिच्या ट्वीटरवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

कंगना ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट आणि स्पष्टवक्तेपणामुळे ती अनेकदा अडचणीतही आली आहे. कंगना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतीच तिने करण जौहर आणि रणबीर कपूर यांच्यावर नाव न घेता सोशल मीडियावरुन टिका केली होती. त्यानंतर तिने आता तिच्याबद्दलच एक पोस्ट शेअर केली आहे.

कंगनाने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती वर्कआउट करताना दिसत आहे. यात ती तिच्या फिटनेस संदर्भात काही ट्रेनिंग घेत आहे. ती व्हिडिओत वर्कआउट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने कॅप्शन दिले की, 'मागील दोन वर्षांपासून माझ्या शरीरातील रक्तातही मिसेस इंदिरा यांचेच विचार होते. आता ही वेळ नवीन भूमिकेकडे वळण्याची आहे. मला आनंद आहे की, मी माझ्या फिटनेस रुटीनकडे परत वळाली आहे'.

तिने कॅप्शनमधून तिच्या नवीन चित्रपटाची हिंट दिली आहे. लवकरच कंगनाचा ‘इमरजन्सी’नंतर आगामी चित्रपट ॲक्शन आणि कॉमेडीने भरलेला असेल अशी खुद्द तिने माहिती दिली आहे. लवकरच चित्रपटाबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे देखील ती म्हणाली आहे.

कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, कंगनाला तिच्या अभिनयासाठी अनेक अवॉर्ड्स मिळाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाला 'पद्मश्री' या पुरस्कराने सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटात कंगनासोबत, अनुपम खेर, श्रेयस तळपदे, सतिश कौशिकसह अनेक कलाकार दिसणार आहेत.

Edited By: Siddhi Hande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फरहानानंतर कोण बनला 'Bigg Boss 19'च्या घराचा नवा कॅप्टन?

Navapur : आश्रम शाळेतील सहा वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू; नवापूर तालुक्यातील घटनेने खळबळ

म्हाडाची बंपर ऑफर! मुंबईतील प्राईम लोकेशनवरील घरांची थेट विक्री, घरे भाड्यानं देण्यासही तयार

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! फक्त एकदा गुंतवणूक करा अन् व्याजातून कमवा लाखो रुपये

Maharashtra Live News Update: धुळे जिल्ह्यासह जवळच्या जिल्ह्यांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

SCROLL FOR NEXT