Kangana Ranaut News  saam tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगनाचे खळबळजनक विधान, म्हणते 'बॉलिवूड अभिनेत्यांना अभिनय करताना अजून पाहिलेच नाही'

कंगनाने #AskKangana या ट्विटरवरील सेटमेंटमध्ये चाहत्यांसोबत मनसोक्त संवाद साधला.

Chetan Bodke

Kangana Ranaut: कंगना रणौत सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपुर्वी तिने ट्वीटरवर दमदार पदार्पण करीत ट्वीटर वॉर सुरु केले आहे. सध्या तिने ट्वीटरवर #AskKangana हे तिनं प्रश्नोत्तराचं सेगमेंट सुरु केले आहे. यामध्ये तिने आपल्या चाहत्यांसोबत मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या.

एका चाहत्याने तिला विचारले, "तुझा आवडता अभिनेता? हृतिक रोशन की दिलजीत दोसांझ ." यावर कंगना म्हणते, "मला वाटते की एक अ‍ॅक्शन करतो आणि दुसरा गाण्याचे व्हिडीओ बनवतो, प्रामाणिकपणे त्यांना कधी अभिनय करताना पाहिलं नाही… एखाद्या दिवशी मी त्यांना अभिनय करताना पाहिलं तरच सांगू शकते… जर असं काही घडलं तर मला कळवा, धन्यवाद #askkangana."

एका चाहत्याने कंगनाला तिच्या आयुष्यातील 'सर्वात निर्णायक क्षण' कोणता असं तिला विचारले. त्यावेळी कंगना म्हणते, "मी खूप लहान असताना घर सोडले होते, तेव्हा मी अशा व्यक्तीला भेटले की ज्याने अत्यंत मानसिक, शारीरिक आणि भावनिक वेदना सहन केल्या होत्या."

तर आणखी एका युजर्सने कंगनाला तू सत्याची निवड करतेस की प्रेमाची? यावर तिने आपण सुर्याची निवड करते असे सांगितले. पुढे कंगना म्हणते, प्रेम आपण निवडत नाही तर प्रेम तुम्हाला निवडते.

कंगना सध्या आगामी चित्रपट 'चंद्रमुखी 2'च्या शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. पी वासू दिग्दर्शित, हा चित्रपट ब्लॉकबस्टर तमिळ हॉरर आणि कॉमेडी चित्रपटाचा सिक्वेल आहे. कंगनासोबत चित्रपटात रजनीकांत आणि ज्योतिका मुख्य भूमिकेत होते.'चंद्रमुखी 2'मध्ये, कंगना राजाच्या दरबारातील नर्तिकेची भूमिका साकारणार आहे, जी तिच्या सौंदर्यासाठी आणि नृत्य कौशल्यासाठी प्रसिद्ध होती. या चित्रपटात कंगनासोबत तामिळ अभिनेता राघव लॉरेन्सही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सोबतच कंगना लवकरच 'इमरजन्सी' चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने या चित्रपटात दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनयाची धुरा पेलली आहे. सोबतच अनुपेम खेर, महिमा चौधरी, विशक नायर आणि श्रेयस तळपदे हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Prime Minister K.P. Sharma Oli resigns : नेपाळमध्ये सत्तापालट; पंतप्रधान ओलींचा राजीनामा

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूरात राज्यस्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन

RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी; ऑफिसर पदासाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

गोकुळचा मोठा निर्णय! लवकरच चीज अन् आईस्क्रीम बाजारात आणणार; शेतकऱ्यांनाही दिलासा

SCROLL FOR NEXT