Koli Community : कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा; महादेव, मल्हार कोळी समाज आक्रमक

Latur News : गॅजेटमध्ये कोळी असा उल्लेख आहे. मात्र हा कोळी हा महादेव कोळी आणि मल्हार कोळी असल्याने तात्काळ महादेव कोळी समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे
Latur News
Latur NewsSaam tv
Published On

संदीप भोसले  

लातूर : मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत हैद्राबाद गॅजेट नुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय झाला आहे. यानंतर आता महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करा. एसटी मधून आरक्षणाची अंमलबजावणी करा; या मागणीसाठी महादेव कोळी समाज आक्रमक झाला आहे. यासाठी १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मराठवाड्यातील नेत्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी लढा सुरु करण्यात आला होता. दरम्यान मुंबई येथे झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मागण्या मान्य करत हैद्राबाद गॅजेटनुसार अंमलबजावणी करण्याचा निर्णय दिला आहे. हा निर्णय करण्यात आल्याने सर्वप्रथम ओबीसी समाज आक्रमक झाला असून या विरोधात आंदोलन छेडले आहे. आता कोळी समाज देखील आक्रमक झाला असून एसटी मधून आरक्षण देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

Latur News
Rahud Ghat Traffic : गॅस टँकर अपघातामुळे राहुड घाटात वाहतूक कोंडी कायम; मनमाड मार्गाने वळविली वाहतूक

हैद्राबाद गॅझेटमध्ये कोळी उल्लेख 

मराठा आरक्षणाच्या मागणीने हैदराबाद गॅजेट समोर आलं आणि याच गॅजेटमध्ये कोळी असा उल्लेख आहे. मात्र हा कोळी हा महादेव कोळी आणि मल्हार कोळी असल्याने तात्काळ महादेव कोळी समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्याची मागणी महादेव कोळी समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाला सरकार जाणून- बुजून खोटी आश्वासन देत अन्याय करत असल्याचा आरोप महादेव कोळी व मल्हार कोळी समाजाने केला आहे. 

Latur News
Pimpri Chinchwad : गणेशोत्सवात लेझर बीम लाईटचा वापर, डीजेचा दणदणाट; पिंपरी चिंचवडमधील ४० मंडळांवर कारवाई

तर आठही जिल्ह्यात पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविणार 

दरम्यान मागच्या चाळीस वर्षापासून महादेव कोळी समाजाला एसटीमधून आरक्षणाची अंमलबजावणी करा. मराठवाड्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाला एसटी प्रमाणपत्र द्या; या मागणीचा लढा सुरू आहे. मात्र या मागणीकडे लक्ष दिले जात नाही. आता या गॅजेट नुसार प्रमाणपत्र मिळावे; अन्यथा १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यात पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवू; असा इशारा देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com