Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'मुलांच्या गुन्ह्यांसाठी पालकांना दोष देऊ...'; केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर कंगना राणौतची प्रतिक्रिया

kangana Ranaut: केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर कंगना राणौतने प्रतिक्रिया देत मुलांच्या गुन्ह्यांसाठी पालकांना दोष देणे चुकीचे असल्याचे म्हटले. सोशल मीडिया आणि AI मुळे आताच्या तरुणाईवर परिणाम होत असल्याचेही ती म्हणाली.

Shruti Vilas Kadam

kangana Ranaut: केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला ट्रेकिंगदरम्यान अपघाती मृत्यू झाल्याचे भासत असले, तरी पोलिसांच्या तपासात हा मृत्यू पूर्वनियोजित हत्येचा असल्याचे समोर आले. या प्रकरणात केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली असून, दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. या धक्कादायक प्रकरणावर आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

कंगनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर सिया गोयलच्या वडिलांचा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओसोबत तिने एक सविस्तर नोट लिहित मुलांच्या गुन्ह्यांसाठी त्यांच्या पालकांना जबाबदार धरणे योग्य नसल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले. तिच्या मते, केवळ घरातील वातावरण किंवा पालकांचे संस्कार पाहून आजच्या तरुणांच्या वर्तनाचा अंदाज बांधता येत नाही.

कंगनाने पुढे लिहिले की, आजची तरुण पिढी वास्तवापेक्षा सोशल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि आभासी जगाच्या अधिक प्रभावाखाली आहे. ही तरुणाई ज्या लोकांशी संवाद साधतात, ज्या प्रकारची माहिती पाहतात आणि ज्या गोष्टींचा सतत संपर्कात राहतात, त्यातून त्यांच्या विचारसरणीवर आणि निर्णयक्षमतेवर परिणाम होत असतो. त्यामुळे प्रत्येक चुकीसाठी पालकांना दोष देणे योग्य नाही, असे तिने नमूद केले.

'आजची तरुणाई दुहेरी आयुष्य जगते'

कंगना राणौतने आपल्या पोस्टमध्ये आजच्या समाजातील बदलत्या मानसिकतेवरही भाष्य केले. तिच्या मते, अनेक तरुण प्रत्यक्ष आयुष्यात आणि सोशल मीडियावर वेगवेगळे व्यक्तिमत्त्व जगतात. समाजात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी अनेक जण आपले खरे व्यक्तिमत्त्व लपवतात. लोक आपल्याकडे कसे पाहतात, याची काळजी अधिक घेतली जाते आणि त्यामुळे वास्तव व आभासी जगातील दरी वाढत चालली आहे.

दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास सुरू असून, पोलिसांकडून विविध पुरावे आणि आरोपींची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाने देशभरात मोठी चर्चा निर्माण केली आहे. कंगना राणौतच्या प्रतिक्रियेमुळे या चर्चेला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. कामाबद्दल बोलायचे झाल्यास, कंगना नुकतीच 'भारत भाग्य विधाता' या चित्रपटात झळकली होती आणि या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

वांगचुक रुग्णालयात, CJPच्या आंदोलनाचं काय? अभिजीत दिपके करणार अन्नत्याग आंदोलन

बिश्नोई गँगच्या रडारवर आमिर खान, तिसरं लग्न आणि धमकी...आमिर खान खरंच लव्ह जिहादी?

Ind vs Eng 3rd ODI : रोहित शर्माच्या रिटायरमेंटची चर्चा असतानाच भारतीय संघात मोठा बदल; कुणाला मिळाली संधी?

FDAची अय्यंगार बेकरीवर धाड; गलिच्छपणा अन् एक्सपायर माल पाहताच 'ऑन द स्पॉट' लायसन्स रद्द, टाळं ठोकलं

SCROLL FOR NEXT