Kangana Ranaut Upcoming Movie Update Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'अति घाई संकटात नेई', कंगनाला ओव्हर एक्साइटमेंट पडली महागात

कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशनच्या शोधात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Emergency Movie Update: कंगना रनौत तिच्या वादग्रस्त कृत्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे तर कधी तिच्या कामामुळे ती लोकांचे लक्ष वेधून घेते. अभिनेत्री कंगनाने तिच्या आगामी चित्रपटामध्ये दिग्दर्शनचीही धुरा हाती घेतली आहे. या चित्रपटाच्या कामानिमित्त गेलेल्या कंगनाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

कंगना रनौत सध्या तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लोकेशनच्या शोधात आहे. ती तिच्या संपूर्ण टीमसह चित्रपटाच्या शूटिंगसाठी जागा शोधत आहे जी कथेला न्याय देऊ शकेल.

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जंगलातील काही फोटोही शेअर केले आहेत. कंगना रनौत तिच्या चित्रपटासाठी मेहनत घेत असल्याचे या फोटोंमध्ये दिसत आहे. या फोटोंवर चाहते भरभरून आपली प्रतिक्रिया देत आहेत. (Social Media)

कंगना रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये नदीत तिचा तोल गेल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करत कंगना रनौतने लिहिले आहे की, जेव्हा तुम्ही जास्त उत्साहित होतात तेव्हा असे होते. कंगनाचा तोल गेल्याने नदीतील पाण्यामुळे भिजली आहे.

कंगनाची हे फोटो आसाममधील काझीरंगा येथील आहे. याची माहिती तिच्या फोटोतील कॅमेंटमुळे लक्षात येत आहे. आसाममधील कंगनाचे फॅन्स कमेंट करून तिचे स्वागत करत आहे.

Kangana Ranaut Instagrm Story

कंगना रनौत इमर्जन्सी चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. या चित्रपटात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पात्र साकारत असून हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित आहे. महिमा चौधरी, अनुपम खेर, श्रेयस तळपदे आणि सतीश कौशिक हे कलाकार सुद्धा इमर्जन्सीमध्ये दिसणार आहेत. (Movie)

कंगनाच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाले तर, ती सर्वेश मेवाडच्या 'तेजस' चित्रपटातही आहे या चित्रपटामध्ये ती भारतीय वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. (Bollywood)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Caramel Custard Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग, घरी बनवा रेस्टॉरंटस्टाईल क्रीमी कॅरॅमल कस्टर्ड, वाचा रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

SCROLL FOR NEXT