Kangana Ranaut Google
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: कंगना रनौत यांच्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आजीचं १०० व्या वर्षी निधन

demise of kangana ranaut grandmother: खासदार आणि अभिनेत्री कंगना रनौत यांच्या आजीचं निधन झाले आहे. त्या १०० वर्षांच्या होत्या. स्वत: कंगना यांनी ही माहिती सोशल मीडियाद्वारे दिली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनय क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीनंतर राजकारणात एन्ट्री घेतलेल्या कंगना रनौत यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंगणा रनौत यांच्या आजीचं निधन झाले आहे. ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांचं निधन झालं आहे. त्या १०० वर्षांच्या होत्या. कंगनाच्या आजीचे नाव इंद्रानी ठाकूर असे होते. शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती कंगना यांनी दिली. यासंबंधी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती.

कंगना यांनी सोशल मीडियावर आपल्या आजीसोबतचे जुने फोटो पोस्ट केले. त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 'काल रात्री माझी आजी इंद्रानी ठाकूर यांचे निधन झाले आहे. संपूर्ण कुटुंब दुःखात आहे. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा', असे आवाहन त्यांनी चाहत्यांना केले आहे.

कंगना म्हणाल्या की, 'माझी आजी खूप चांगली होती. त्यांना पाच मुलं होती. त्यांची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, तरीसुद्धा त्यांनी आपल्या सर्व मुलांना उच्चदर्जाचे शिक्षण दिले. आपल्या मुलींनाही स्वत:च्या पायावर उभे केले. त्यांची सुद्धा सरकारी नोकरी होती. त्यांची पाचही मुलं आयुष्यात यशस्वी होती. त्यांना त्यांच्या मुलांचा अभिमान वाटायचा.' दरम्यान, काही दिवसांपूर्वी त्या घरातील खोलीची साफसफाई करत होत्या आणि त्याचवेळी त्यांना ब्रेन स्ट्रोक आला होता.

Edited by : Priyanka Mundinkeri

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT