Kangana Ranaut Reaction On The Ban Of The Kerala Story Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut On Adah Sharma: ‘द केरला स्टोरी’ वरील बंदी घातल्याने कंगना संतापली, म्हणाली, 'हा संविधानाचा अपमान'

Kangana Ranaut Reaction On The Ban Of The Kerala Story: अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चित्रपटावर प्रतिक्रिया आल्यानंतर आता कंगनानेही यावर चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chetan Bodke

Kangana Ranaut On Adah Sharma The Kerala Story: बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेली ‘द केरला स्टोरी’ चित्रपट रिलीज झाल्यापासून कमालीचा चर्चेत आहे. याला कारण ठरलंय चित्रपटाची कथा. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी चित्रपटावर प्रतिक्रिया आल्यानंतर आता कंगनानेही यावर चित्रपटावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नुकतेच बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री यांनीही चित्रपटाबद्दल आपली बाजू मांडली होती. अशातच कंगना पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. तिने ‘द केरला स्टोरी’ फेम अभिनेत्री अदा शर्माबद्दल वक्तव्य केले आहे. सध्या तिचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे. मनोरंजन विश्वातील घडामोडी असो किंवा राजकीय हालचाली सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना नेहमीच प्रतिक्रिया देते. बिंधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारी कंगना पुन्हा एकदा आपल्या विधानामुळे चर्चेत आली आहे.

दरम्यान, कंगना रणौतने अदा शर्मा मुख्य भूमिकेत असलेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाबाबत तिची प्रतिक्रिया दिली आहे . मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रणौतने चित्रपटावर बंदी घालणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच ‘सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने पारित केलेल्या चित्रपटावर बंदी घालणं हा तर संविधानाचा अपमान असल्याच तिनं सांगितलं आहे.’ असेही म्हटले आहे. अदा शर्माच्या या चित्रपटावर काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. कंगना राणौतने हे वक्तव्य केले आहे.

अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाला वादाचा फटका सहसा जास्त बसलेला नाही. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 200 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. अदा शर्माच्या 'द केरला स्टोरी' या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहून निर्माते आणि चाहते खूप खूश आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT