Kangana Ranaut Saam Tv
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut: 'जेनरेशन गटार', 'ड्रग्ज, दारू आणि शारीरिक संबंध...'; तरुणींबद्दल कंगना रनौत नको ते बरळली

Kangana Ranaut : कंगना रनौतने इन्स्टाग्राम स्टोरीत हिंदू तरुणींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. नेटकऱ्यांनी तिच्या पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया देत ट्रोल करण्यास सुरुवात केली.

Shruti Vilas Kadam

Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत विरोधकांवर टीका केल्यानंतर आता तिने इन्स्टाग्राम स्टोरीमधून आजच्या पिढीतील हिंदू तरुणींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. तिच्या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत कंगनाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने स्वतंत्र करिअर करणाऱ्या महिलांबद्दल भाष्य करताना लिहिले, "स्वतंत्र महिला स्वतःचा मार्ग स्वतः निवडतात. त्या स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पार पाडतात आणि आपल्या कर्तृत्वाच्या बळावर आयुष्य घडवतात. त्या पालकांच्या किंवा कुटुंबाच्या आधारावर जगत नाहीत," असे म्हटले.

यानंतर तिने आजच्या पिढीतील काही तरुणींवर टीका करत त्यांना "मी त्यांना जनरेशन गटार म्हणते, ज्या तथाकथिक वेस्टर्न कल्चर स्वीकारलेल्या भारतीय स्त्रियांची एक नवी जनरेशन आहे. ना या शिक्षणात सरस आहेत, ना सौंदर्यात... आणि त्यांची मानसिकता तर अजिबातच कौतुकास्पद नाही. त्यांची मानसिकता इतकी विकृत असते की, त्या चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत. समाजाला देण्यासारखं त्यांच्याकडे काहीही मोलाचं नसतं. तरीही, ड्रग्ज घेणं, दारू पिणं आणि अनेकांसोबत लैंगिक संबंध ठेवणं या गोष्टींमधून आपल्या 'स्वातंत्र्याचं' त्या अभिमानानं प्रदर्शन करतात"

कंगनाने पुढे असेही म्हटले की, अनेक तरुणी स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसतानाही पालकांच्या कमाईवर जगतात आणि स्वतःला स्वतंत्र समजतात. जबाबदाऱ्या स्वीकारल्याशिवाय खरे स्वातंत्र्य मिळत नाही, असेही तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

मात्र, कंगनाच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या विधानावर टीका करत ते महिलांचा अपमान केला असल्याचे म्हटले आहे. एका युजरने लिहिले, "बहुतेक लोक या मताशी सहमत होणार नाहीत." दुसऱ्या युजरने, "ज्या गोष्टींसाठी ती आज इतरांवर टीका करत आहे, त्याच गोष्टी तिच्या आयुष्यातही घडल्या आहेत," अशी प्रतिक्रिया दिली. तर आणखी एका नेटकऱ्याने, "तिने स्वतःचा भूतकाळ विसरला आहे का?" असा प्रश्न विचारला आहे. तर आणखी एकाने ' तू देखील हेच करुन शिकली आहेस' असा टोला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT