Nag Ashwin On Jigra SAAM TV
मनोरंजन बातम्या

Alia Bhatt : आलिया भट्टच्या ॲक्शनवर कल्कीचे डायरेक्टर फिदा, भरभरून कौतुक करत म्हणाले...

Nag Ashwin On Jigra : आलिया भट्टचा आगामी ॲक्शन ड्रामा चित्रपट 'जिगरा' लवकरच रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. आलियाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

Shreya Maskar

बॅालिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) नेहमी तिच्या चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिच्या अभिनयाने चाहते वेडे आहेत. आलिया आता पुन्हा एकदा नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आलियाचा 'जिगरा' (Jigra) हा ॲक्शन ड्रामा चित्रपट ११ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात आलिया ॲक्शन मोडमध्ये दिसणार आहे. 'जिगरा' चा टीझर रिलीज झाला आहे. ८ सप्टेंबर रोजी हा ॲक्शन टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरमध्ये आलिया एका वेगळ्या लूकमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरला प्रेक्षकांनी ही खूप चांगला प्रतिसाद दिला आहे.

आलिया सध्या 'जिगरा' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. टीझरमध्ये आलिया भट्ट आणि वेदांग रैना भाऊ- बहिणीच नातं दाखवल आहे. आलिया आपल्या भावाचे संरक्षण करताना दिसत आहे. जेव्हा तिच्या भावाला परदेशात अधिकाऱ्यांनी अटक केली तेव्हा दुश्मनचा सामना करण्यासाठी ती खास प्रशिक्षण घेते. या टीझरवर अनेक कलाकारांच्या आणि चाहत्यांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहे. अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. आलियाने आपल्या अभिनयाने सगळ्यांचे मन जिंकले आहे. हा टीझर रिलाज होताच 'कल्की : २८९८ एडी' या चित्रपटाच्या दिग्दर्शकाने आलियाचे खूप कौतुक केले आहे. त्यांना आलियाची भूमिका खूप आवडली आहे. कल्कीचे दिग्दर्शक नाग अश्विन (Nag Ashwin) यांनी आपल्या सोशल मीडियावर स्टोरी शेअर करून आलियाचे कौतुक केले आहे. "खूप छान काम केले आहे. चित्रपटाची आता प्रतीक्षा करू शकत नाही." यातून नाग अश्विनचित्रपट पाहण्यासाठी किती उत्सुक आहेत हे दिसत आहे.

Nag Ashwin

'जिगरा'ची ही कहानी एका बहिणीची आहे. जी बहिण आपल्या भावाला संकटातून सोडवण्यासाठी काहीही करू शकते. अंगावर शहारे आणणारा हा भन्नाट चित्रपट आहे. या टीझरच्या सुरुवातीला, आलिया भट्ट एका बारमध्ये बसलेल्या एका वृद्ध व्यक्तीला स्वतःची आणि तिच्या भावाची गोष्ट सांगताना दिसत आहे. या चित्रपटाच्या 2 मिनिट 49 सेकंदाच्या टीझरमध्ये, वेदांग रैना शेवटचा दिसत आहे. त्याचे मौन टीझरला वेगळ्या वळणावर घेऊन जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT