Kajol Breaks No-Kissing Policy Saam TV
मनोरंजन बातम्या

Kajol Breaks In The Trial : आम्हाला संकोच वाटला नाही.. २९ वर्षांनी काजोलने मोडली नो-किसिंग पॉलिसी ; सहकलाकाराने शेअर केला शूटिंगचा अनुभव

Ali Khan Viral Video : अली खानने पाकिस्तानी युट्युबर नादीर अलीला दिलेल्या मुलाखतीत त्याचा काजोलसोबत कामाचा अनुभव शेअर केला आहे.

Pooja Dange

The Trial Kajol And Ali Khan Scene : अभिनेत्री काजोल सध्या चर्चेत आहे. लस्ट स्टोरीज २ या नेटफ्लिक्सवरील चित्रपटातून काजोल ओटीटीवर पदार्पण केले. लस्ट स्टोरीजमधील काजोलच्या कामाचे कौतुक होत असताना तिची नवीन वेबसीरीज 'द ट्रायल' प्रदर्शित झाली आहे. या वेबसीरीजमध्ये काजोलने अनेक वर्षाची पॉलिसी ब्रेक केली आहे.

'द ट्रायल - कानून, धोका' असे या वेबसीरीज नाव असून 'द गुड वाइफ' या वेबसीरीजचे भारतीय व्हर्जन आहे.या वेबसीरीजमध्ये काजोलने तिची २९ वर्षाची पॉलिसी ब्रेक केली आहे. काजोलने तिची नो किसिंग पॉलिसी या मोडली आहे. (Latest Entertainment News)

काजोलने या वेबसीरीजमध्ये तिचा सहकलाकार अली खानसोबत लिप-लॉक सीन केला आहे. अली खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने या सीनदरम्यानच्या काही गोष्टी शेअर केल्या आहेत.

अली खानने पाकिस्तानी युट्युबर नादीर अलीला दिलेल्या मुलाखतीत त्याचा काजोलसोबत कामाचा अनुभव शेअर केला आहे. अली खानने सांगितले की, 'आम्हाला हा सीन करताना कोणतीही लाज, संकोच वाटलं नाही. आमचे किससिंग सीनचे शूटिंग एका पॉश हॉटेलमध्ये झाले. दिग्दर्शकाने आम्हाला या सीनच्या आधी सेट कसा हवा किती माणसे हवी हे विचारलं.'

अली खानने पुढे सांगितले की, 'आम्ही फायनल टेक आधी या सीनची रिहर्सल केली. शॉट झाल्यानंतर आम्ही दोघे स्क्रीनजवळ जाऊन शॉट कसा झाला हे पाहिले देखील. तसेच आम्ही एकमेकांना शॉट पारपेक्ट आहे का हे विचारले.

'द ट्रायल' वेबसीरीजविषयी बोलायचे झाले तर अजय देवगण या वेबसीरीचा निर्माता आहे. या वेबसीरीजमध्ये काजोल आणि अली खान व्यतिरिक्त जिशू सेनगुप्ता, कुब्बरा सैत, गौरव पांडे आणि आमिर अली यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कोल्हापूर उत्तर मधून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयाच्या उंबरठ्यावर

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रात भाजपच्या याशामागे आहेत २ सूत्रधार, अमित शहांनी दिली होती मोठी जबाबदारी

पुन्हा येईन! भाजपच मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का?

Pravin Darekar: महाराष्ट्राच्या जनतेची पुन्हा आम्हाला पसंती, प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया | Video

SCROLL FOR NEXT