Kajol Angry on Trolls Saam TV
मनोरंजन बातम्या

Kajol Angry on Trolls : ट्रोलर्सवर संतापली काजोल! पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केला राग...

Kajol: ट्रॉलर्सवर संतापली काजोल! पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने व्यक्त केला राग...

Satish Kengar

Kajol Slams Trolls: बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्रीचा उल्लेख केला तर त्यात काजोलचे (Kajol) नाव नक्कीच येईल. काजोलने ९० च्या दशकात आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

काजोल सोशल मीडियावर आपला बराच वेळ घालवते. दरम्यान, काजोलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून काजोलने ट्रोल्सवर निशाणा साधला आहे आणि तिचा राग त्यांच्यावर काढला आहे. (Latest Marathi News)

काजोल तिच्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध आहे. काजोल अनेकदा आपले मत उघडपणे मांडताना दिसली आहे. दरम्यान, शनिवारी काजोलने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली.

काजोलने या पोस्टमध्ये एक फोटो शेअर केला आहे. ज्यात एक नोट लिहिली आहे. या नोटमध्ये काजोलने लिहिले आहे की, भित्र्या लोकांचा स्वतःचा सेट आणि शब्दकोश आहे. यासोबत तिने हॅशटॅग #ThisHitHome असं लिहिलं आहे.

पुढच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काजोलने लिहिले आहे की, अलविदा फक्त त्यांच्यासाठी आहे जे डोळ्यांनी प्रेम करतात. जे मनापासून प्रेम करतात त्यांच्यासाठी चमत्कार सारखी कोणतीही गोष्ट नाही...रूमी. अशाप्रकारे कोणाचाही उल्लेख न करता काजोलने आपला राग व्यक्त केला आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, काजोलने ही गोष्ट सोशल मीडिया ट्रोलसाठी लिहिली आहे.

दरम्यान, अलीकडेच काजोलने तिची मुलगी न्यासा देवगनचा 20 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी काजोलने न्यासासोबतचा एक फोटो शेअर करत मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काजोलची मुलगी न्यासा अनेकदा तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : समुद्रकिनारी उभा असलेला पालघरमधील 'हा' भव्य ऐतिहासिक किल्ला, देतोय मराठ्यांच्या शौर्याची साक्ष

Famous Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

पुण्यात काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या कारचा भीषण अपघात; खासगी रुग्णालयात उपचार सुरू

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना लॉटरी लागणार! आठव्या वेतन आयोगात पगारवाढीचा फॉर्म्युला बदलणार?

Maharashtra News Live Update: आसाममध्ये सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचे भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT