'कच्चा बदाम' या बंगाली गाण्याने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्याची क्रेझ एवढी आहे की इंस्टाग्रामची रील उघडताच तुम्हाला हे गाणे सर्वात आधी ऐकायला मिळेल. इंस्टाग्रामपासून ते सर्व सोशल मीडियावर (Social Media) लोक वेगवेगळ्या पद्धतीने या गाण्यावर डान्सचे व्हिडिओ टाकत आहेत. हे गाणे कोणत्याही प्रसिद्ध गायकाने गायलेले नसून हातगाडीवर शेंगदाणे विकणाऱ्याने गायले आहे.
पश्चिम बंगालच्या बीरभूमी जिल्ह्यात भुवन बडायकर हा हातगाडीवर फिरून शेंगदाणे विकत होते. तेव्हा कोणीतरी भुबनचे हे गाणे रेकॉर्ड केले आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. जिथून हे गाणे रातोरात व्हायरल झाले. यानंतर लोकांनी या गाण्यावर डान्स व्हिडिओ बनवले आणि भुवनला रातोरात प्रसिद्ध केले.
या गाण्याने आता भुबनचेही आयुष्य बदलले आहे, कारण तो एका गाण्यात हिरोच्या भूमिकेत दिसत आहे. वास्तविक या गाण्याचे हरियाणवी व्हर्जन तयार करण्यात आले आहे. ज्यामध्ये भुबनची एक वेगळी शैली लोकांना पाहायला मिळत आहे. हे गाणे ५ फेब्रुवारी रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आले आहे. या गाण्यात भुबनचा लूक पूर्णपणे बदलला आहे. हरियाणवी व्हर्जनचे हे गाणे सोशल मीडिया प्रचंड व्हायरल झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.