Kaala Paani Trailer Instagram
मनोरंजन बातम्या

Kaala Paani Official Trailer: काळजात धडकी भरवणाऱ्या ‘काला पाणी’चा रहस्यमयीन ट्रेलर प्रदर्शित, वेबसीरीजमध्ये दिसणार मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी

Chetan Bodke

Kaala Paani Official Trailer Shared Social Media

सध्या सोशल मीडियावर मोना सिंह आणि आशुतोष गोवारीकर प्रमुख भूमिकेत असणाऱ्या ‘काला पाणी’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. सध्या सोशल मीडियावर अनेक नव्या चित्रपटांची चर्चा सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वेबसीरीजची घोषणा केल्यानंतर नुकताच निर्मात्यांनी वेबसीरीजच्या ट्रेलरची घोषणा केली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताच, अवघ्या काही वेळातच वेबसीरीजच्या ट्रेलरची प्रेक्षकांमध्ये चर्चा होत आहे.

या थरारक ट्रेलरमध्ये आपल्याला एक रहस्यमयीन कथा पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये अंदमान निकोबार बेटाची कथा पाहायला मिळत आहे. तिथल्या नागरिकांना अंदमानला वेढलेला समुद्र त्रास देत आहे, असं दिसत आहे. अंदमानच्या नागरिकांना हा सामना करावा लागत आहे.

त्यामुळे तिथल्या अडकलेल्या नागरीकांना, मदत करण्यासाठी एक टीम सज्ज असते. त्या बेटावर अडकलेले माणसं संकटाचा सामना कसा करतात?, ते कशाप्रकारे त्या संकटातून वाचण्याचा प्रयत्न करतात?, ती त्या संकटातून जगणार की वाचणार? अशा अनेक गोष्टींची उत्तरं आपल्याला ‘काला पानी’या वेबसीरीजमध्ये मिळणार आहेत.

या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत, मराठी कलाकारांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दिसणार आहेत. वेबसीरीजमध्ये आशुतोष गोवारीकर यांच्यासह अमेय वाघ, चिन्मय मांडलेकर या मराठी सेलिब्रिटींसोबत बॉलिवूड अभिनेत्री मोना सिंग सुद्धा वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. समीर सक्सेना आणि अमित गोलानी दिग्दर्शित ‘काला पानी’ ट्रेलरमध्ये कसलेल्या कलाकारांची फौज दिसतेय. ही वेबसीरीज नेटफ्लिक्सवर १८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. तर वेबसीरीजची कथा बिस्वपती सरकारने लिहिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकू, नागपुरातील मेळाव्यात अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना कानमंत्र

Uddhav Thackeray: ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटावर मित्र पक्षाने व्यक्त केली नाराजी, उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित म्हटलं...

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हाचे पतीसोबत रोमँटिक फोटोशूट, पाहा PHOTOS

Buldhana Fire: खामगाव शहराजवळील श्रीहरी लॉन्सला भीषण आग; सर्वत्र पसरल्या आगीच्या ज्वाळा

Akshay Shinde: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू कसा झाला? ७ तास चाललेल्या पोस्टमॉर्टममधून सत्य आलं बाहेर

SCROLL FOR NEXT