Juhi Chawla Saam Tv
मनोरंजन बातम्या

Holi Special 2025: 'अंग से अंग लगाना'; जुही चावलाने सांगितला 'डर' चित्रपटातील 'या' गाण्याचा अनुभव

Juhi Chawla: होळीच्या निमित्ताने अभिनेत्री जुही चावलाने डर या चित्रपटातील 'अंग से अंग लगाना' या सुप्रसिद्ध गाण्याच्या शूटिंगचे काही खास किस्से सांगत त्यावेळी कशाप्रकारे शूट व्हायचे हे सांगितले.

Shruti Vilas Kadam

holi Special 2025: जुही चावला, शाहरुख खान आणि सनी देओल अभिनीत 'डर' मधील 'अंग से अंग लगना' हे होळीचे गाणे आजही लोकप्रिय आहे. यश चोप्रा दिग्दर्शित या गाण्यामध्ये सेलिब्रेशन आणि थ्रिल दोन्ही सारख्याच प्रमाणात दिसून येते. होळीच्या निमित्ताने अभिनेत्री जुही चावलाने या गाण्याच्या खास आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

गाण्याच्या शूटिंगची आठवण करून देताना जुही म्हणते, "आम्ही लोणावळ्यातील एका घराच्या लॉनवर हे गाणे शूट केले होते. त्वचेची आणि केसांची काळजी घेण्याबद्दल बोलायचे झाले तर, आम्ही तरुण होतो आणि त्यावेळी फॅन्सी लोशन, सनस्क्रीन आणि ते सर्व नाटक नव्हते. फक्त एकच गोष्ट होती की शूटिंग करताना आम्हाला सनबर्न होऊ द्यायचा नव्हता कारण बाहेर बरेच शूटिंग होते. त्यामुळे आम्ही वापरत असलेल्या मेकअपशिवाय स्पॉट बॉईजने मोठ्या छत्र्या धरून ठेवल्या होत्या."

जुही पुढे म्हणते, "तेव्हा आमच्याकडे व्हॅनिटी व्हॅन नव्हत्या, त्यामुळे घराच्या वरच्या मजल्यावरील खोल्या मेकअप रूम म्हणून वापरल्या जात होत्या आणि आम्ही शूटिंगसाठी खाली यायचो, जे खूप सोयीचे होते. शाहरुख त्याच्या शूटिंगसाठी एका दिवसासाठी आला होता जिथे तो ढोल वाजवत होता आणि सनीजी (सनी देओल), अनुपमजी (अनुपम खेर), तन्वीजी (तन्वी आझमी) आणि मी आमचे शूट करत होतो.

जुही चावल्याने तिच्या अभिनय कारकिर्दीत असनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत. तिचा डर हा चित्रपट चांगलाच गाजला आणि या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटात जुही चावला व्यतिरीक्त शाहरुख खान,सनी देओल, अनुपम खेर, तन्वी आझमी आदी कलाकार मुख्य भूमिकेत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT