Jug JUg Jeeyo Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jug Jug Jeeyo : वरूण-कियाराच्या 'जुग जुग जिओ'ची पहिल्याच दिवशी कोटींची झेप, पण...

सुमारे १५० कोटी रुपये खर्चून बनलेला 'जुग जुग जिओ' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे सुरुवात करू शकला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज मेहता दिग्दर्शित 'जुग जुग जिओ'(jug jug jiyo) हा कौटुंबिक मनोरंजन चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. वरुण धवन (varun dhavan), कियारा अडवाणी(kiara advani), नीतू कपूर, अनिल कपूर आणि मनीष पॉल हे कलाकार या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारत आहेत. सुमारे १५० कोटी रुपये खर्चून बनलेला 'जुग जुग जिओ' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे सुरुवात करू शकला नाही. देशभरात सुमारे ३ हजार ३७५ स्क्रीन्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ८.५० कोटींची कमाई केल्याचे सांगितले जाते.

'जुग जुग जिओ'ची ओपनिंग फारशी चांगली झाली नाही. वृत्तानुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी सुमारे साडेआठ कोटींची कमाई केली आहे, जी 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'गंगुबाई काठियावाडी'पेक्षा कमी होती. या दोन्ही चित्रपटांची ओपनिंग जवळपास १०.५० कोटी रुपयांची होती.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या अहवालानुसार, 'जुग जुग जिओ'ने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर ८.५० कोटींचा व्यवसाय केला आहे. दिल्ली-एनसीआर आणि मेट्रो शहरांव्यतिरिक्त देशातील इतर शहरांमध्येही या चित्रपटाला पहिल्याच दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. निर्मात्यांना अंदाजे १० कोटींची अपेक्षा होती. शनिवार आणि रविवारी 'जुग जुग जिओ'च्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते, असा विश्वास निर्मात्यांना आहे.

चित्रपटाचा सर्वात मोठा यूएसपी (Unique Selling Point) हा या चित्रपटातील कॉमेडी आहे आणि याचे सर्व श्रेय अनिल कपूर आणि मनीष पॉल यांना देऊ शकता. अनिल कपूर महत्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटातही फिटनेस-फ्रीक्स दाखवले आहेत. ते फक्त त्यांच्या लूकची काळजी घेतात. या चित्रपटात अनिल कपूरला प्रेक्षकांना बघायला धमाल येणार आहे. दुसरीकडे, मनीष पॉलचे विनोदाचे टायमिंग अप्रतिम आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, 'हिंदी चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची जादू फारशी चाललेली नसताना चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत चिंता वाढली आहे. कोणत्या प्रकारचा चित्रपट चालेल आणि कोणत्या प्रकारचा चित्रपट चालणार नाही, असा नवा सिद्धांत दर आठवड्याला समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT