Jr NTR  saam tv
मनोरंजन बातम्या

Jr NTR : ज्युनियर एनटीआर पोहचला KIMS रुग्णालयात; चाहत्यांना अतिउत्साह पडला महागात, पोलीसांनी केला लाठीमार | VIDEO

Jr NTR Visit KIMS Hospitals : साऊथ सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहत्यांनी हॉस्पिटल बाहेर गर्दी केली. येथे खूप धक्काबुक्की झाली, ज्यामुळे पोलीसांना लाठीमार करावा लागला. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

ज्युनियर एनटीआरने KIMS रुग्णालयाला भेट दिली.

ज्युनियर एनटीआरला पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली.

गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांनी लाठीमार केला.

साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरला (Jr NTR) पाहण्यासाठी चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सोशल मीडियावर ज्युनियर एनटीआरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तो चाहत्यांमध्ये घेरलेला दिसत आहे. सुपरस्टारला पाहण्यासाठी चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर तुफान गर्दी केली.

रविवारी बेंगळुरूमधील एका खाजगी सुपर-स्पेशालिटी रुग्णालयाच्या ( KIMS Hospitals in Bengaluru) उद्घाटन समारंभाला होता. त्याला ज्युनियर एनटीआर उपस्थित राहिला. हजारो चाहते ज्युनियर एनटीआर यांची एक झलक पाहण्यासाठी उत्सुक होते. त्यामुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. गर्दी इतकी मोठी होती की गर्दीच्या दबावामुळे एस्केलेटर तुटताना दिसत आहे.

ज्युनियर एनटीआरला पाहण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चाहत्यांची तुफान गर्दी दिसली. चाहते रुग्णालयात घुसताना दिसत आहेत. ज्यामुळे रुग्णालयात, तेथील कर्मचाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. सुरक्षा रक्षक आणि बाउन्सर गर्दीला रोखू शकले नाहीत. तसेच ज्युनियर एनटीआर गाडीतून चाहत्यांना भेटला त्यांना नमस्कार देखील केला. त्याला एक नजर पाहण्यासाठी चाहते गोंधळ घालत होते.

लोकांच्या तुफान गर्दीमुळे जेव्हा परिस्थिती आयोजक आणि खाजगी सुरक्षा पथकाच्या नियंत्रणाबाहेर गेली तेव्हा पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. अहवालांनुसार गर्दी कमी करण्यासाठी आणि रुग्णालय परिसर रिकामा करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. व्हिडिओ क्लिपमध्ये एक चाहता एस्केलेटर तुटल्यानंतर त्यावर पडताना दिसतो. रुग्णालयासारख्या संवेदनशील परिसरात असा गोंधळ पाहून सर्वांनाच धक्का बसला.

ज्युनियर एनटीआरचा हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच व्यवस्थापनावर टीका केली. चाहते आता ज्युनियर एनटीआरच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओ उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

SCROLL FOR NEXT