Jr NTR and Ram Charan Will not going to perform on Natu Natu Song
Jr NTR and Ram Charan Will not going to perform on Natu Natu Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jr NTR On Oscars: ऑस्कर आधीच RRR सिनेमाला मोठा धक्का, ऑस्कर सोहळ्यातून 'नाटू नाटू गाणं.. Jr. NTR चं धक्कदायक विधान

Saam Tv

Jr NTRAt Talk About Dance In Oscars: राजामौली दिग्दर्शित 'आरआरआर' चित्रपटातील गाण्याला 'नाटू नाटू' या गाण्याला ऑस्कर नामांकन मिळाले आहे. हा सोहळा 12 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर सोहळा होणार आहे. चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटातील दोन मुख्य कलाकार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सध्या मुलाखतींमध्ये व्यस्त आहेत.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये अभिनेता ज्युनियर एनटीआरला 95 व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात त्याचा RRR सह-कलाकार राम चरण 'नाटू नाटू' आयकॉनिक गाण्याविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्याला उत्तर देत ज्युनियर एनटीआरने सांगितले की, एमएम कीरावानी, राहुल सिपलीगुंज आणि काला भैरव गाणे सादर करणार आहेत. अभिनेता नाही तर संपूर्ण भारत रेड कार्पेटवर उतरणार असल्याचे ज्युनियर एनटीआरने सांगितले.

'नाटू नाटू' हे एसएस राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या पीरियड अॅक्शन चित्रपट 'RRR' मधील हिट गाणे आहे. हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. आगामी ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या पुरस्कारासाठी याला नामांकन मिळाले आहे. अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेला 'RRR' हा दोन दशकांहून अधिक काळातील पहिला भारतीय चित्रपट आहे. 'नाटू नाटू' हे ऑस्करमध्ये नामांकन मिळालेले पहिले भारतीय गाणे आहे.

माध्यमांशी बोलताना ज्युनियर NTR या कार्यक्रमात 'नाटू नाटू'वर नाचणार नसल्याचे सांगितले. अभिनेता म्हणाला की, "मला वाटत नाही की ते शक्य होईल, आम्ही त्या गणयावर डान्स करावा असं मला मनापासून वाटत होत. पण, दुर्दैवाने, आम्हाला रिहर्सल करायला वेळ मिळाला नाही. आम्हाला जगातील सर्वात मोठ्या मंचावर असे तयारी केल्याशिवाय जायचे नाही.

आम्ही व्यस्त होतो, मी व्यस्त होतो आणि कदाचित चरण देखील अनेक पूर्वनियोजित कामांमुळे व्यस्त होता. त्यामुळे मला नाही वाटतं आम्ही सादरीकरण शकतो. पण आमचे संगीत दिग्दर्शक कीरवानी, गाण्याचे गायक राहुल आणि माझा भाऊ भैरव, गाणे सादर करतील. मला वाटते की आम्ही प्रेक्षकांनामध्ये बसलेच चांगलं आहे. कारण ज्या क्षणी मी ती क्लिप पाहतो, माझे पाय पुन्हा दुखू लागतात."

ऑस्करच्या रेड कार्पेटवरील वॉकविषयी बोलताना ज्युनियर एनटीआर म्हणाला, "मी त्यासाठी तयार आहे. मला वाटत नाही की तिथे एनटीआर ज्युनियर असेल, मला वाटत नाही की तो मी असेन, मला वाटत नाही की तो कोमाराम भीम रेड कार्पेटवर चालणार आहे. मला वाटतं की संपूर्ण देश, आम्ही संपूर्ण देशाला आमच्या हृदयात घेऊन त्या रेड कार्पेटवर चालणार आहोत. तो मी असू शकतो. राजामौली असू शकतात, माझा सह-कलाकार राम चरण असू शकतो, आम्ही आमच्या देशाला आमच्या हृदयात घेऊन चालणार आहोत. मी या क्षणाची वाट पाहत आहे.''

RRR 1920 च्या दशकातील अलुरी सीताराम राजू (राम चरण) आणि कोमाराम भीम (ज्युनियर NTR) दोन भारतीय क्रांतिकारकांभोवती विणलेल्या स्वातंत्र्यपूर्व काळातील काल्पनिक कथा आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, अजय देवगण आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

SCROLL FOR NEXT