Journey Release Date Declared Instagram/ @shantanusmoghe
मनोरंजन बातम्या

Journey Release Date Declared: असामान्य संघर्षाची ‘जर्नी’ लवकरच उलगडणार, ‘या’ तारखेला येणार भेटीला

Journey Film Release Date: एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट उलगडणारा ‘जर्नी’ चित्रपट येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

Chetan Bodke

Journey Release Date And New Poster Released

एका असामान्य संघर्षाच्या प्रवासाची गोष्ट उलगडणारा ‘जर्नी’ चित्रपट येत्या ६ ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सचिन दाभाडे फिल्म्स प्रस्तुत, सचिन जीवनराव दाभाडे निर्मित ‘जर्नी’चे नवीन पोस्टर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत शंतनू मोघे, शर्वरी जेमेनीस आणि शुभम मोरे हे कलाकार दिसणार आहेत.

प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये भावनिक, कौटुंबिक चित्रपट असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये तिघांच्याही चेहऱ्यावर गंभीर भाव दिसून येत आहेत. त्या तिघांच्याही आयुष्यात आलेले चढउतार, संघर्ष काय आहेत?, त्या संघर्षामुळे तिघांच्याही आयुष्यामध्ये त्याचा काय परिणाम होणार, या सगळ्याची ‘जर्नी’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

सचिन जीवनराव दाभाडे दिग्दर्शित या चित्रपटात अंजली उजवणे, योगेश सोमण, ओमकर गोवर्धन, सुनील गोडबोले, मिलिंद दास्ताने यांच्यासह माही बुटाला आणि निखिल राठोड या बालकलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रवींद्र मठाधिकारी लिखित या चित्रपटाची कथा सचिन दाभाडे यांची आहे तर भास्कर देवेंग्रेकर, तानाजी माने, संतोष राठोड, अनिकेत अरविंद बुटाला सहनिर्माते आहेत. (Actors)

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सचिन जीवनराव दाभाडे म्हणतात, “एका लहान मुलाच्या असामान्य प्रवासाची ही कथा आहे. त्याचा हा जीवनप्रवास या मुलाला कोणत्या वळणावर नेतो, हे 'जर्नी'मध्ये पाहायला मिळणार आहे. आयुष्यातील प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. 'जर्नी'तील प्रवास हा कुटुंबाशी, नात्यांशी आणि स्वतःशी असलेली लढाई आहे. कुटुंबातील प्रत्येकाने पाहावा असा हा चित्रपट आहे. या प्रवासादरम्यान खूप गोष्टी उलगडत जाणार आहेत.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anna Hazare:'अण्णा आता तरी उठा'! ... मग तुम्ही झोपून राहणार का? बॅनरबाजीवर अण्णा हजारे भडकले

Vice president Election : उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचा उमेदवार ठरला; भाजप अध्यक्षांकडून नाव जाहीर

Accident : भीषण अपघात! कार-एसयूव्हीच्या धडकेत लागलेल्या आगीत ७ जण जिवंत जळाले

Monsoon Health : मुलांना सतत सर्दी-खोकला? हा नैसर्गिक उपाय ठरेल सुरक्षित आणि प्रभावी

HIV In Women: महिलांमध्ये HIV ची कोणती लक्षणे दिसतात?

SCROLL FOR NEXT