John Abraham
John Abraham Saam TV
मनोरंजन बातम्या

'एक व्हिलन रिटर्न्स' नंतर आता 'तारिक'; जॅान अब्राहमची स्वातंत्र्यदिनानिमित्त नव्या चित्रपटाची घोषणा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आज भारताचा ७५ वा स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्ष देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बॅालिवूडच्या (Bollywood) अॅक्शन किंग जॉन अब्राहमने आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. जॅान आता वेगवेगळ्या अॅक्शन चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नुकताच जॅानचा (John Abraham) 'एक व्हिलन' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनातून उतरत नाही, तोच जॅानने आणखी एका चित्रपटाची (Film) घोषणा केली आहे. जॉन अब्राहमने त्याच्या आगामी तारिक चित्रपटाची घोषणा केली आहे.

जॅानने ट्विटर हॅडलवर एक पोस्टर शेअर करत त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, आंनदाची बातमी देत स्वातंत्र्यदिन (Independence Day) साजरा करायची ही वेळ आहे. 'बाटला हाऊस' आणि 'तेहरान' नंतर आता आम्ही 'तारिक' घेऊन आलो आहोत.

यासोबतच त्याने आजादी का अमृत महोत्सव हैशटैग केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले असून जॉन अब्राहम, संदीप आणि शोभना यादव या चित्रपटाची निर्मिती करत आहोत.

पाहा व्हिडीओ -

अलीकडेच जॉनने अॅक्शनपट तेहरान चित्रपटाची घोषणा केली होती. अलीकडेच, चित्रपटाचा फर्स्ट लूकही समोर आला .ज्यामध्ये जाॅन च्या दमदार व्यक्तिरेखेने चाहत्यांना वेड लावले आहे. चित्रपट हा २०२३ प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

जॉन अब्राहम नुकताच अर्जुन कपूर आणि दिशा पटानीसोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' चित्रपटात दिसला होता. जॅानचा तेहरान हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. जो सत्य घटनांवर आधारित आहे. याशिवाय जॅान शाहरुख आणि दीपिकासोबत 'पठाण' चित्रपटातही दिसणार आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amruta Khanvilkar : चंद्राच्या घायाळ करणाऱ्या अदा; साडीत अमृताचे क्लासिक फोटोशूट

Special Report : मनसे नेते Avinash Jadhav यांच्या अडचणीत वाढ? जाधवांवर खंडणीचा गुन्हा दाखल

Uddhav Thackeray: १० वर्षापूर्वी चहावर चर्चा केली, आता कामावर चर्चा करा; उद्धव ठाकरेंनी PM मोदी- शहांना केलं लक्ष्य

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे गेल्या १० वर्षात साडेसात वर्षे सत्तेत, मग उद्योग गुजरातला कसे गेले? ; कोकणातून राज ठाकरेंची तोफ धडाधडली

साडीत खुललं Sonalee Kulkarni चं मनमोहक सौंदर्य; पाहा अप्सरेचे Photos

SCROLL FOR NEXT