दिल्लीमधील जवाहर लाल नेहरू विद्यापीठात 'द साबरमती रिपोर्ट' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगलवेळी मोठा राडा झाला. शो चालू असताना दगडफेक झाल्याची घटना घडल्याचं समोर आले आहे. डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी नेहमी अभविपच्या कार्यक्रमात अडचण निर्माण करतात. आजही त्यांच्याकडून दगडफेक करण्यात आली तसेच विद्यापीठात लावलेले चित्रपटाचे पोस्टर फाडण्यात आल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून करण्यात आलाय.
डाव्या विचारसरणीचे विद्यार्थी हे वारंवार करतात. यापूर्वी जेव्हा आम्ही एका चित्रपटाचे प्रदर्शन आयोजित केले होते, तेव्हाही त्यांच्याकडून असेच करण्यात आले होते. त्यात एका गार्डच्या पायाला दुखापत झाली. आजही डाव्या विद्यार्थ्यांकडून दगडफेक झाली, त्यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती अभविपकडून देण्यात आलीय. डाव्या विचारसरणी गटाच्या संघटनेची ही नेहमीची पद्धत आहे. बाहेर हे वाद विवाद करण्याचं सांगतात. परंतु जेव्हा अभविपकडून असे काही कार्यक्रम केले जातात तेव्हा यांच्याकडून, असा गोंधळ घातला जातो असा आरोप अभविपच्या विद्यार्थ्याने केलाय.
आम्ही 2016, 2017 आणि 2018 मध्येही अशा प्रकारचे चित्रपट दाखवले होते. तेव्हाही डाव्यांनी केवळ लाईट घालवली आणि अभविपच्या विद्यार्थ्यांना मारहाणही केली होती. दरम्यान विक्रांत मॅसीचा 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट नुकताच चर्चेत होता. वर्ष २००२ मध्ये गुजरात दंगेवरती हा चित्रपट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींही हा चित्रपट पाहिलाय. तसेच काही भाजपशासित राज्यात या चित्रपटाला टॅक्स फ्री करण्यात आले आहे.
2002 साली साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला लागलेल्या आगीच्या घटनेच्या तपासावर आणि त्यानंतर झालेल्या दंगलीवर हा चित्रपट केंद्रित आहे. हा चित्रपट एका पत्रकाराची कथा आहे जो या घटनेचे सत्य उलगडण्याचा प्रयत्न करतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.