Jiya Shankar - Palak Purswani Friendship Saam TV
मनोरंजन बातम्या

Jiya Shankar In BB OTT2: वेडमधल्या जिया शंकरचा मोठा खुलासा; पलक माझ्या एक्सला...

Jiya Shankar On Palak Purswani: 'बिग बॉस ओटीटी २' मध्ये पलक आणि जियामध्ये वाद होताना दिसत आहे

Pooja Dange

Jiya Shankar - Palak Purswani Friendship: बिग बॉस' हा शो एक लोकप्रिय शो आहे. नुकतचं बिग बॉसचं ओटीटी २ सुरू झाले आहे. यात रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड'मधील जिया शंकर स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे. तर तिची मैत्रिण पलक पुरस्वानी ही देखील बिग बॉसमधील स्पर्धक आहे. या दोघींची मैत्री मात्र शोमध्ये दिसत नाही. नुकताच या दोन घट्ट मैत्रिणींमध्ये वाद झाला.

'बिग बॉस ओटीटी २' मध्ये पलक आणि जियामध्ये वाद होताना दिसत आहे. या शोमध्ये पलकचा एक्स बॉयफ्रेंड अविनाश सचदेव ही आहे. बॉयफ्रेंडवरून त्याच्यात वाद सुरू झाला आहे. जिया आणि पलक दोघीही एकमेकींना सुनावत होत्या. (Latest Entertainment News)

पलक जियाचे बोलणे ऐकत नव्हती. तेव्हा जिया संतापून म्हणते, 'तू आता माझ्याशी बोलतही नाही आहेस कारण तू माझं ऐकूनच घ्यायचं नाही. तू माझ्या वाढदिवसाला आली होती, पण आलीस आणि बाकीच्या लोकांसोबत जाऊन पार्टी करत होतीस. माझ्या सोशल मीडियावर माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत होता. पण त्यात तू माझी मैत्रिण असून ना मला शुभेच्छा दिल्या ना एखादी पोस्ट माझ्यासाठी केलीस. तूला माझ्याशी साधं बोलावसही वाटलं नाही'.

जियाने पलकवर आपल्या मनातील सर्व खंत बोलून दाखवली. "ही खूप लहान गोष्ट आहे. पण माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण तू माझी मैत्रिण आहेस ना. मला या गोष्टीचं खूप वाईच वाटलं. कारण त्यादिवशी माझा वाढदिवस होता. माझ्याच मैत्रिणीने माझ्याशी असं का वागावं ? तूला माझ्याशी प्रोब्लेमस होते ना मग तू माझ्याशी येऊन बोलायचं होतं. तू माझ्याशी कितीही वाईट वागली तरी मी तुझ्याशी चांगलीच वागणार".

पलकनेही यावर जियाला उत्तर दिले. "मला असं वाटलं की मी या पार्टीला नव्हतं यायला हव होत. कारण मी येताच तुझी रिएक्शन तशी होती." "त्यावर या सर्व गोष्टी पलक तू माझ्याशी येऊन बोलायला हव होतं" असं जिया म्हणाली. (Bigg Boss OTT)

जियाने परत नवीन विषय सुरू केला, "मी माझ्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप केलं त्यानंतर तू त्याला सारखी फोन करायची. त्याला सतत वेगवेगळ्या ठिकाणी भेटायला बोलवायची. यावर पलक म्हणाली की, जियाने तू मला तसं बोलायला हवे होते."यावर जिया म्हणाली," हे माझ्यासाठी त्रासदायक होते". त्यावर पलक म्हणाली की, माझ्याबाबतही असं झालं होतं. मीही या सगळ्यातून गेली आहे".

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT