Jitendra Joshi Upset With Reel Creators Instagram
मनोरंजन बातम्या

Jitendra Joshi News: निर्लज्जपणा, बेफिकीरी, उद्दामपणा येतो कुठून? रिल बनवणाऱ्यांवर अभिनेता जितेंद्र जोशी संतापला; नेमकं काय झालं?

Jitendra Joshi Upset With Reel Creators: अभिनेता जितेंद्र जोशीने नुकताच नेटकऱ्यांवर संताप व्यक्त करत एक पोस्ट शेअर केली आहे.

Chetan Bodke

Jitendra Joshi Angry Post On Reel Stars: चित्रपट, नाटक आणि उत्तम कवी अशी ओळख असलेल्या जितेंद्र जोशीचे सोशल मीडियावर असंख्य चाहते आहेत. मराठी सिनेसृष्टीत अनेक नाटक, चित्रपट दिल्यानंतर आता अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केलंय. कायमच सोशल मीडियावर सक्रिय राहणारा जितेंद्र अनेकदा त्याच्या कवितेमुळे चर्चेत राहतो.

कवितेच्या माध्यमातून त्याने अनेकदा विविध सामाजिक विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच अभिनेत्याने त्याच्या कवितेविषयी एक महत्वाची पोस्ट शेअर केली आहे. सध्या अभिनेत्याची ही पोस्ट सोशल मीडियावर बराच चर्चेचा विषय ठरली आहे.

सध्या सोशल मीडियावर रिल्सचा ट्रेंड भन्नाट सुरू आहे. अनेक नेटकरी कविता, फेमस डायलॉगवर रिल्स बनवत शेअर करतात. या अशा इन्फ्लुएंसरवर अभिनेता जितेंद्र जोशीने महत्वाचे भाष्य केले आहे. दुसऱ्यांच्या कविता आणि आवाज वापरणाऱ्यांनी किमान श्रेय त्या व्यक्तीला द्यायला हवं असं म्हणत त्याने स्टोरी शेअर केली आहे. सध्या अभिनेत्याच्या या स्टोरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

Jitendra Joshi Angry Post On Reel Stars

कवितेचा आणि आवाजाचा वापर करणाऱ्यांवर जितेंद्र जोशी म्हणतो, “एखाद्याच्या आवाजातील त्याचीच कविता स्वत:चा रील बनवण्यासाठी वापरताना त्या माणसाच्या नावाचा उल्लेख सुद्धा करु नये हे वाटण्याचा निर्लज्जपणा किंवा बेफिकिरीमधून येणारा उद्दामपणा कुठून येत असावा?” अशा आशयाची स्टोरी अभिनेत्याने शेअर केली आहे. नेमकी ही स्टोरी त्याने कोणासाठी लिहिली आहे?, कोणाबद्दल केली आहे?, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. (Actors)

जितेंद्र जोशी, गौरी नलावडे, विक्रम गोखले, नीना कुलकर्णी आणि संजय मोने हे कलाकार ‘गोदावरी’मध्ये प्रमुख भूमिकेत होते. चित्रपटाने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये मानाचे पुरस्कार मिळवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT