Jhimma 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhimma 2: 'माझा बाबा गेल्यावर माझ्या आईला...', 'झिम्मा २'मधील या डायलॉगचा सिद्धार्थ चांदेकरच्या खऱ्या आयुष्याशी काय आहे संबंध?

Jhimma 2 Movie: सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा २' चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधील सिद्धार्थच्या डायलॉगने सर्वांचेच लक्ष वेधले. याविषयीच सिद्धार्थने आपली भावना व्यक्त केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jhimma 2 Movie Siddharth Chandekar Role:

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 'झिम्मा २' चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. २४ नोव्हेंबरला चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे. 'झिम्मा २' ची चर्चा सर्वत्र आहे. त्याचसोबत चित्रपटातील कलाकारांचीदेखील चर्चा आहे. त्यातील एक कलाकार म्हणजे सिद्धार्थ चांदेकर.

सिद्धार्थ नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असतो. तो नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मध्यंतरी त्याच्या आईचे लग्न झाले. यासाठी सिद्धार्थने पुढाकार घेतला होता. त्यासाठी त्याचे सर्व क्षेत्रातून कौतुक होताना दिसत आहे. अशाच आशयाचा एक सीन 'झिम्मा २' च्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला आहे. याच डायलॉगविषयी सिद्धार्थने आपले मत मांडले आहे.

'झिम्मा २' ट्रेलरमध्ये सिद्धार्थ चांदेकरचा एक डायलॉग प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. यात सिद्धार्थ म्हणतो की, 'माझा बाबा गेल्यावर माझ्या आईला एखाद्या पार्टनरची गरज असेल याचा मी कधीच विचार केला नाही'. हा डायलॉग ऐकताच सिद्धार्थच्या वैयक्तिक आयुष्याची सर्वांनाच आठवण येते. खऱ्या आयुष्यातही सिद्धार्थने आईसाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. दरम्यान त्याने 'लोकसत्ता' चॅनलला मुलाखत दिली. तेव्हा तो या सीनविषयी बोलला.

'झिम्मा २' चित्रपटातील संवाद आणि आईचे नाते याविषयी त्याने खुलासा केला आहे. तो म्हणाला, 'ते माझ्यासाठी सरप्राईज होतं. कारण खऱ्या आयुष्यात आईबाबतीत असा विचार माझ्या डोक्यात खूप आधीपासून चालू होतं. वर्ष दीड वर्षापासून याबद्दल चर्चा सुरू होती. ते हळहळू होत गेलं. चित्रपटात हे वाक्य आलं तेव्हा मी खूप सरप्राईज झालो. माझ्या डोक्यात जो विचार चालू होता तेच चित्रपटात दाखवलं. चित्रपटाचे शुटिंग चालू होते तेव्हा माझ्या आणि माझ्या आईच्या डोक्यात तोच विचार चालू होता. तो काहीतरी वेगळा अनुभव आहे. मी आयुष्यात जर खूप काही चांगलं केल असेल तर ते हे आहे. याचा मला अभिमान आहे. असं म्हणत सिद्धार्थने आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर सर्व कलाकारांनी सिद्धार्थचं खूप कौतुक केलं.

मध्यंतरी सिद्धार्थने आपल्या आईचे दुसरे लग्न करण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि चित्रपटातील त्याची भूमिका अगदी सारखीच असल्याचे त्याने सांगितले.

सिद्धार्थ या चित्रपटात कबीर हे पात्र साकारत आहे. सिद्धार्थसोबतच चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, रिंकू राजगुरू, शिवानी सुर्वे, सुचित्रा बादेंकर अशी तगडी स्टारकास्ट दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT