Bony Kapoor Cried Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Jhalak Dikhhla Jaa 11 च्या सेट अचानक रडू लागले बोनी कपूर, मलाइका अरोरा पाहतच राहिली; VIDEO व्हायरल

Bony Kapoor Cried Video: 'झलक दिखला जा 11' शोमध्ये 'मिस्टर इंडिया' चित्रपटाचे निर्माते बोवी कपूर (Bony Kapoor) सहभागी झाले होते. गेस्टच्या रुपाने ते या शोमध्ये आले होते.

Priya More

Jhalak Dikhhla Jaa 11 Promo:

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध डान्स रियालिटी शो 'झलक दिखला जा 11' (Jhalak Dikhhla Jaa 11 ) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये 'मिस्टर इंडिया' चित्रपटाचे निर्माते बोवी कपूर (Bony Kapoor) सहभागी झाले होते. गेस्टच्या रुपाने ते या शोमध्ये आले होते. यावेळी त्यांनी त्याचा ४३ वर्षांचा फिल्म इंडस्ट्रीतील प्रवास सांगितला. अशामध्ये ते अचानक या शोमध्ये रडू लागले. यामागचे कारण म्हणजे त्यांचा मुलगा आणि अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) वडीलांसाठी खास संदेश दिला होता. हा व्हिडीओ पाहताच ते रडू लागले.

'झलक दिखला जा 11'चा होस्ट ऋत्विक धनजानी बोनी कपूर यांना सांगतो की, 'मी तुमच्यासाठी एक सरप्राईज देत आहे.' यानंतर बोनी कपूर यांना अर्जुन कपूरचा एक खास व्हिडिओ दाखवण्यात येतो. या व्हिडिओमध्ये अर्जुन म्हणतो, 'हॅलो पप्पा, मला आशा आहे की तुम्ही शोचा आनंद घेत असाल. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की माझे वडील या जगात एक अत्यंत निस्वार्थी व्यक्ती आहेत. मला वाटते की त्यांच्या भावना स्वतःपेक्षा इतरांसाठी जास्त आहेत. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो. मला तुमच्याबद्दल खूप आदर आहे.'

अर्जुन कपूरचा हा व्हिडीओ पाहून आणि त्याचा खास मेसेज ऐकून बोनी कपूर नि:शब्द होतात आणि रडू लागतात. बोनी कपूर यांना रडताना पाहून या शोमध्ये असलेले इतर सदस्य देखील इमोशनल होतात. अशामध्ये या शोची जज आणि अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड मलायका अरोरा देखील बोनी कपूरकडे गोड स्माईलने पाहत राहते. त्यानंतर फराह खान उठून बोनी कपूर यांच्या खुर्चीजवळ जाते आणि म्हणते की, 'बोनीची सर्व मुलं त्याच्यावर खूप प्रेम करतात.' त्यानंतर ती रडत असलेल्या बोनी कपूर यांना शांत करते. त्याचवेळी होस्ट गौहर खान आणि स्पर्धक अंजलीही यावेळी भावूक झाल्या आणि त्या देखील रडू लागल्या.

सोनी चॅनेलने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'अर्जुनच्या मेसेजने केवळ बोनीच नाही तर आम्हाला सर्वांना रडवले.' दरम्यान, 'झलक दिखला जा 11'च्या माध्यमातून बोनी कपूर आणि मलायका अरोरा यांनी पहिल्यांदाच स्टेज शेअर केला आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही त्यांच्या लव्ह लाईफ चर्चेत असतात. सोशल मीडियावर देखील हे कपल एकमेकांवर प्रेम व्यक्त करत असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT