Yogita Chavan And Saorabh Choughule Ukhana Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

'एक होती चिऊ, एक होता काऊ…', लग्नानंतर योगिता- सौरभने एकमेकांसाठी घेतले जबरदस्त उखाणे; VIDEO व्हायरल

Yogita Chavan And Saorabh Choughule Ukhana Video: या कपलने रिल लाइफ पार्टनरचा रिअल लाइफ पार्टनर म्हणून स्वीकार केला. मोठ्या थाटामाटामध्ये या कपलचे लग्न पार पडले. योगिता आणि सौरभच्या लग्नाला त्याच्या जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारांनी हजेरी लावली.

Priya More

Yogita Chavan And Saorabh Choughule Wedding:

'जीव माझा गुंतला' (Jeev Majha Guntala) फेम अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि अभिनेता सौरभ चौघुले (Saorabh Choughule) हे नुकताच विवाहबंधनात अडकले. या कपलने रिल लाइफ पार्टनरचा रिअल लाइफ पार्टनर म्हणून स्वीकार केला. मोठ्या थाटामाटामध्ये या कपलचे लग्न पार पडले. योगिता आणि सौरभच्या लग्नाला त्याच्या जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवारांनी हजेरी लावली. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशामध्ये आता या कपलचा लग्नानंतर घेतलेल्या उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुले यांनी लग्नानंतर एक फोटो शेअर करत आपल्या लग्नाची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यानंतर या कपलने लग्नातील खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी त्यांची प्रसिद्ध मालिका ज्यामध्ये त्यांनी एकत्र काम केले आहे त्या'जीव माझा गुंतला'लाचे टायटल साँग लावले आहे. या व्हिडीओमध्ये हे कपल लग्नामध्ये डान्स करताना एकमेकांना वरमाला घालताना, सप्तपदी घेताना, लग्नानंतर एकच जल्लोष करताना दिसत आहेत. या कपलसोबत त्यांच्या कुटुंबातील सदस्य देखील खूप धम्माल करताना विडीओमध्ये दिसत आहे.

आता योगिता चव्हाण आणि सौरभ चौघुलेचा लग्नानंतर उखाणा घेतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. योगिता लग्नानंतर उखाणा घेतान म्हणते की, 'जागोजागी होईल मला याचाच भास, सौरभचं नाव घेते भरवून भाताचा घास' तर सौरभ देखील आपल्या बायकोसाठी खास उखाणा घेतो. उखाणा घेताना सौरभ म्हणतो की, 'एक होती चिऊ, एक होता काऊ…योगिताला घास भरवायला मी वाट कोणाची पाहू' त्यांच्या या व्हिडीओला खूप चांगली पसंती मिळत आहे. चाहत्यांनी दोघांवर देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

योगिता आणि सौरभने लग्नामध्ये खूपच क्युट दिसत होते. योगिताने हिरवी काठ आणि मरून कलरची साडी नेसली होती. नववधूच्या रुपामध्ये योगिता खूपच सुंदर दिसत होती. तर सौरभने पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि धोरत परिधान केले होते. त्याचसोबत त्याने हिरव्या रंगाची शाल आणि डोक्यावर हिरव्या-सोनेरी रंगाचा फेटा बांधला होता. या लूकमध्ये सौरभ खूपच हँडसम दिसत होता. योगिता आणि सौरभने लग्नातील सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'कायमचा हमसफर, 03.03.2024' कॅप्शनमध्ये त्यांनी लग्नाची तारीख टाकली आहे. या कपलच्या फोटो आणि व्हिडीओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT